रवळ्या-जवळ्या

(जवळ्या या पानावरून पुनर्निर्देशित)


रवळ्या-जवळ्या हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जोडकिल्ले आहेत.

रावळ्या-जावळ्या
नाव रावळ्या-जावळ्या
उंची मी.१६४० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण कळवण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव उत्तरेकडून मुळाणे,नरुळ, दक्षिण बाजूकडुन बाबापुर,खिरमाडी,
डोंगररांग सातमाळा डोंगर रांग
सध्याची अवस्था मध्यम
स्थापना {{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान

संपादन

कळवण ते मुळाणे(जांभूळपाडा) १५ किलोमीटर तेथुन पश्चिमेस पायवाट आहे ‌१ कि.मी.

इतिहास

संपादन

जवळ्या किल्ल्याची ऊंची : 4055 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रवळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे.

इतिहास : ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायऱ्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

संपादन

पाण्याचे टाके, बांधकाम केलेल्या ठिकाण, महादेवची पिंड,

गडावरील राहायची सोय

संपादन

या गडावरती रहायची सोय नाही.

गडावरील खाण्याची सोय

संपादन

नाही पण खाली मुळाणे गावात येऊन होते.

गडावरील पाण्याची सोय

संपादन

आहे

गडावर जाण्याच्या वाटा

संपादन

१)मुळाणे (जांभूळपाडा)या गावातुन पायवाट आहे २) मार्कंडेय बारीकडून कळवण ते नाशिक रोडने बारीपर्यत तेथुन पायवाट आहे

जाण्यासाठी लागणारा वेळ

संपादन

१तास

संदर्भ

संपादन

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा

हे सुद्धा पहा

संपादन