जलाल आगा (रोमन लिपी: Jalal Agha ;) (जन्मदिनांक अज्ञात - ५ मार्च, इ.स. इ.स. १९९५) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता होता. मुगल-ए-आझम या इ.स. १९६० साली पडद्यांवर झळकलेल्या हिंदी चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे त्याने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९९० च्या दशकापर्यंत त्याने विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.

जलाल आगा
जलाल आगा
जन्म जलाल आगा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

५ मार्च, इ.स. इ.स. १९९५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

संपादन