स्थापनासंपादन करा

जलस्रोत लोकसहभागातून विकसित कराण्यासाठी ‘जलबिरादरी महाराष्ट्र' शाखेची स्थापना करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या राजस्थानचा कायापालट करणारे व पाणीवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध जलतज्ज्ञ,मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या ‘जलबिरादरी’ने आता महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीपासून या प्रकल्पाची सुरुवात झाली.

अग्रणीच्या उमगपासूनच्या प्रवासातील खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ हे महाराष्ट्रातील सर्व तालुके अवर्षणप्रवण भागात येतात.नदी पुनरुज्जीवनाच्या प्रयोगात नदीवर बंधाऱ्यांची साखळी निर्माण करण्यात येणार आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी पात्रातच अडवून ठेवण्याचा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.

जलबिरादरी महाराष्ट्र ही संस्था अग्रणी नदी खोऱ्यामध्ये 107 गावांमध्ये काम करत आहे