जय भीम कॉम्रेड हा २०११ मधील आनंद पटवर्धन दिग्दर्शित भारतीय माहितीपट आहे. १९९७ च्या रमाबाई हत्याकांडातील पोलीस हिंसाचाराच्या वर्णनाने या चित्रपटाची सुरुवात झाली आहे. हा माहितीपट मुंबईतील दलित लोकांच्या जीवनाचे आणि राजकारणाचे विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १४ वर्षांचा कालावधी लागला आणि रमाबाईच्या घटनेच्या खटल्यांच्या निकालानंतर २०११ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात दर्शविला गेला आणि त्याला प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली. याने असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.[]

पुरस्कार

संपादन
  • राम बहादूर ग्रँड प्राइज, फिल्म दक्षिण आशिया, काठमांडू, नेपाळ, २०११[]
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट / व्हिडिओ, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारत, २०१२[]
  • सर्वोत्कृष्ट माहितीपटांसाठी फायरबर्ड पुरस्कार २०१२, हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव[]
  • विशेष ज्यूरी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, भारत, २०१२[]
  • बार्टोक पुरस्कार, जीन रौच फिल्म आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०१२[]

नामनिर्देशने

संपादन

डॉकफेस्ट स्पर्धा, ४८वा शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, २०१२.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Matzner, Deborah (Fall 2014). "Jai Bhim Comrade and the Politics of Sound in Urban Indian Visual Culture". Visual Anthropology Review. 30 (4): 127–138.
  2. ^ Ram Bahadur Trophy for Best Film, Festival of South-Asian Documentaries, 2011
  3. ^ Kaur, Puneet (19 January 2014). "Anand Patwardhan's documentary 'Jai Bhim Comrade': Voicing the unheard". DNA. 30 November 2014 रोजी पाहिले.
  4. ^ Golden Firebird Award, Hong Kong International Film Festival, 2012
  5. ^ "59th National Film Awards for the Year 2011 Announced" (Press release). Press Information Bureau (PIB), India. 1 January 2014 रोजी पाहिले.
  6. ^ Palmarès / Award-winning films 2012
  7. ^ "48th Chicago International Film Festival Announces Films in Competition | Chicago DIY Film" (इंग्रजी भाषेत). 2021-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 March 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन