जयसिंगराव तलाव
जयसिंगराव तलाव हा कागल शहरातील एक तलाव आहे.
स्थापना
संपादनहा तलाव राजर्षी छ. शाहू महाराजांनी कागल गावच्या पाणी पुरवठ्यासाठी स. न. १८९२ ते १८९४ या काळात बांधून घेतला. तलावाचे क्षेत्र ७६एकर २१ गुंठे इतके असुन बंधारा १८०० फूट आहे. तलावाच्या बांधकामास त्यावेळी १९२।- रुपये इतका खर्च आला.हा तलाव १९४८ साली कागल नगरपरिषदेस हस्तांतरित करण्यात आला.[१]
परिसर
संपादनजयसिंगराव तलाव हा गेली १२० वर्षे कागलच्या सौंदर्यात भर घालत असून कागल नगराची तहान भागवत आहे. हाच तलाव आपल्या परिसरात अतिशय विपुल पक्षीसौंदर्यही बाळगून आहे. हिवाळ्यात स्थानिक व स्थलांतरीत पाहुण्यांनी तलावाचा परिसर गजबजून जातो. अतिशय योग्य असा नैसर्गिक अधिवास आणि सुरक्षितता यामुळे प्रत्येक वर्षी येणाय्रा पाहूण्यांची संख्या वाढतच आहे. कोल्हापूर कागल रस्त्यावर लक्ष्मी टेकडी उतरत असताना पूर्वेस जयसिंगराव तलाव नजरेस पडतो. तलावाच्या शताब्दी वर्षानिमित्त नगरपालिका प्रशासनाने कच्च्या बंधाऱ्याचे भरीकरण व अतिशय सुंदर असे सुशोभीकरण केले आहे. नगरपालिका प्रशासन व कागलचे नागरिक तलावच्या स्वच्छतेसठी जागरूक आहेत.[२]
संदर्भ
संपादन- ^ "जयसिंग तलाव बंधाऱ्याला भेगा". Maharashtra Times. 2016-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-09 रोजी पाहिले.
- ^ पाखरे, जनार्दन (२००६). कागल दर्शन. कागल: संत विभूती प्रकाशन. pp. ८-१०.