जयती घोष

भारतीय अर्थशास्त्रज्ञ
(जयंती घोष या पानावरून पुनर्निर्देशित)

जयती घोष या सेंटर फोर इकोनॉमिक स्टडीज ऐण्ड प्लानिंग, स्कूल ऑफ सोशल सायन्स, जवाहलरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली या ठिकाणी अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.[] जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, विकसनशील राष्ट्रांमध्ये रोजगाराचे / कामाचे स्वरूप, सुक्ष्मअर्थशास्त्रीय धोरणे आणि लिंगभाव आणि विकास या क्षेत्राशी सम्बंधित त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्याचप्रमाणे त्या भारतीय वर्तमानपत्रे आणि स्तंभलेखन करतात. घोष या 'इंटरनॅशनल डेव्हेपल्पमेंट इकोनॉमिक असोसिएटच्या कार्यकारी सचिव आहेत.[]

जयती घोष
जन्म नाव जयती घोष
जन्म १६ सप्टेंबर १९५५
राष्ट्रीयत्व भारतीय

शिक्षण

संपादन
  • पी.ए.डी (अर्थशास्त्र), केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड, १९८३[]
  • एम. फिल (अर्थशास्त्र), केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड, १९७९* एम. ए. (अर्थशास्त्र), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली, १९७७[]
  • बी. ए. (समाजशास्त्र), दिल्ली विद्यापीठ, १९७५[]

१९८४ साली जयती घोष यांनी केंब्रिज विदयापीठामधून श्री. टी बायरेस यांच्या मार्गदर्शनाखाली नॉन कपिटॅलिस्ट लँड रेंट: थेरिज ॲण्ड द केस ऑफ नोर्थ इंडिया हा प्रबंध सादर केला.[]

पुस्तके

संपादन
  • घोष, जयती; चंद्रशेखर, सी. पी. (२००१). क्राइसिस ॲज कॉन्क्युयेस्ट: लर्निंग फ्रॉम इस्ट एशिया. न्यु दिल्ली: ओरिएंट लॉंगमॅन.[]
  • घोष, जयती; चंद्रशेखर, सी. पी. (२००४) [फस्ट पब्लिश. लेफ्टवर्ड बुक्स:२००२]. द मार्केट दॅट फेल्ड: निओलिब्रल इकोनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया (दृ. सं.). न्यु दिल्ली: लेफ्टवर्ड बुक्स. रिप्रिंटेड जनुअरी २००८, जनुअरी २००९, जुलै २०११.[]
  • घोष, जयती (२००९). नेव्हर डन ॲण्ड पुअरली पेड: वुमेन्स वर्क इन् ग्लोबलाजयझिंग इंडिया. न्यु दिल्ली: वुमेन अनलिमिटेड.[]
  • घोष, जयती (२००९). अफटर क्राईसिस: ॲडज्टमेंट, रिकवर्व्ही, ॲण्ड फ्रागिलिटी इन इस्ट एशिया. न्यु दिल्ली: तुलिका बुक्स. एडिटेड द फोर्थकमिंग इकोनॉमिसक्स ऑफ द न्यु इमपेरिअलिसम[]


नेव्हर डन ऐंड पुअरली पेड :‌ वुमन्स वर्क इन ग्लोबलायजींग इंडीया पुस्तकाची पार्श्वभूमी

संपादन

१९९० नंतर भारतीय अर्थव्यवथेने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही धोरणे राबविली. मात्र या धोरणांचा भारतीय अर्थवस्थेवर विरोधाभासात्मक परिणाम झालेला दिसून येतो. जसे की, जयती घोष हया त्यांच्या नेव्हर डन ॲण्ड पुअरली पेड: वुमेन्स वर्क इन ग्लोबलायझिंग इंडिया[] या पुस्तकाच्या प्रस्तावने मध्ये दिसते की, नवीन आर्थिक धोरण राबवून उत्पादक रोजगाराची पूर्तता झाली नाही. त्यातून मोठ्या प्रमाणात स्त्री कामगारांचे शोषण होऊ लागले. यामध्ये विरोधाभासात्मक बाब म्हणजे कामाचा सहभागी दर वाढला मात्र एकाचवेळी विनावेतन श्रम, रोजगाराच्या निम्मित्ताने स्थलांतर आणि खुली बेरोजगारीही वाढली. एकूणचा जागतिकीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि कामाच्या स्वरूपामध्ये कशाप्रकारचे बदल झाले याविषयी हे पुस्तक भाष्य करते.[] जर भारतातील समकालीन तसेच जागतिकीकरणाचे स्त्रियांच्या कामावर तसेच कामाच्या स्वरूपामध्ये झालेल्या बदलाचा आढावा घ्यायचा असल्यास हे पुस्तक उपयुक्त आहे.[]

संदर्भसूची

संपादन

घोष, जयती (२००९). नेव्हर डन ॲण्ड पुअरली पेड: वुमेन्स वर्क इन् ग्लोबलाजयझिंग इंडिया. न्यु दिल्ली: वुमेन अनलिमिटेड.

  1. ^ "Jayati Ghosh". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-06-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Afzal Guru row 'constructed conspiracy' by state: JNU professor Jayati Ghosh". dna (इंग्रजी भाषेत). 2016-03-05. 2018-06-30 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "Jayati Ghosh | Welcome to Jawaharlal Nehru University". www.jnu.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-30 रोजी पाहिले.
  4. ^ Ghosh, Jayati (2001). Crisis as Conquest: Learning from East Asia (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 9788125018988.
  5. ^ Chandrasekhar, C. P.; Ghosh, Jayati (2004). The market that failed: neoliberal economic reforms in India (इंग्रजी भाषेत). Leftword. ISBN 9788187496458.
  6. ^ a b Ghosh, Jayati (2009). Never Done and Poorly Paid: Women's Work in Globalising India (इंग्रजी भाषेत). Women Unlimited. ISBN 9788188965441.
  7. ^ Ghosh, Jayati; Chandrasekhar, C. P. (2009). After Crisis: Adjustment, Recovery, and Fragility in East Asia (इंग्रजी भाषेत). Tulika Books. ISBN 9788189487584.
  8. ^ Basu, Ranjeeta (2011). "Review of Never Done and Poorly Paid: Women's Work in Globalising India, ; Working the Night Shift: Women in India's Call Center Industry, ; Women, Identity and India's Call Centre Industry". Signs. 37 (1): 247–251. doi:10.1086/660184.
  9. ^ Basu, Ranjeeta (2011-09). "Never Done and Poorly Paid: Women's Work in Globalising India. By Jayati Ghosh. New Delhi: Women Unlimited, 2009.Working the Night Shift: Women in India's Call Center Industry. By Reena Patel. Stanford, CA: Stanford University Press, 2010.Women, Identity and India's Call Centre Industry. By J. K. Tina Basi. London: Routledge, 2009". Signs: Journal of Women in Culture and Society (इंग्रजी भाषेत). 37 (1): 247–251. doi:10.1086/660184. ISSN 0097-9740. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)