जनुक
जनुक हे सजीवांमधील आनुवांशिकतेचे एकक आहे. हा सामान्यत: DNAचा असा तुकडा जो प्रथिनाच्या एखाद्या प्रकारासाठी संकेत (code) आहे किंवा असा RNAचा तुकडा की ज्याला त्या सजीवामध्ये काहीतरी कार्य आहे. सगळी प्रथिने आणि कार्यकारी RNA साखळ्या (chains) ह्या जनुकांकडुन सांकेतल्या जातात. जनुकांमध्ये सजीव पेशी बांधण्याची तसेच जगवण्यासाठीची सर्व माहिती साठवलेली असते.