धूळपाटी/जनावरांच्या दातांवरून वयाचा अंदाज काढणे

(जनावरांच्या दातांवरून वयाचा अंदाज काढणे. या पानावरून पुनर्निर्देशित)

शेळी

प्राणी : संपादन

गाय,म्हैस, बैल

कृती : संपादन

१)सर्व प्रथम  जनावराच्या तोंडात किती दात आहेत याची माहिती घेण्यासाठी त्याच्या मालकाच्या मदतीने जनावराचा जबडा उघडावा.

        २)जबड्यात दिसणाऱ्या दातांचे व्यवस्थित निरीक्षण करावे.

        ३)निरीक्षण करताना या गोष्टीचे निरीक्षण नक्की करावे कि त्या जनावराचे  दुधाचे दात किती आहेत व कायम दात किती आहेत.

        ४)निरीक्षण करून झाल्यानंतर केलेल्या निरीक्षणानुसार जबड्यातील दातांची आकृती बनवावी.

        ५)बनवलेल्या आकृतीच्या नुसार जनावराच्या वयाचा सटीक अंदाज लावावा.

सावधगिरी : संपादन

        १)जनावराचा जबडा उघडून दातांचे  निरीक्षण करताना जनावर हाताला चावा घेणार नाही याची काळजी घ्यावी.

        २)अनोळखी जनावराचा जबडा उघडून दातांचे  निरीक्षण करताना त्याच्या मालकाची मदत  घ्यावी.कि जेणे करून ते आपल्याला

    चावा घेणार नाही   

विशेष माहिती : संपादन

दाताच्या संख्येवरून जनावराच्या वयचा अंदाज खालील माहितीच्या आधारे करता येईल.

गाय,म्हैस, बैल  

      १) जन्माबरोबर    -  २ दुधाचे

  २) १५ दिवसानंतर    -   ४ दुधाचे

      ३) २१ दिवसानंतर  -  ६ दुधाचे

     ४) ३०  दिवसानंतर   -  ८ दुधाचे

     ५) २ ते ३ वर्ष     -  २ कायमचे, ६ दुधाचे

     ६) ३ ते ४ वर्ष     -  ४ कायमचे, ४ दुधाचे

     ७) ४ ते ५ वर्ष     -  ६ कायमचे, २ दुधाचे

  ८) ५ वर्षाच्यापूढे     -  ८ कायमचे

      शेळी

     १) जन्माबरोबर    -  ६ दुधाचे

     २) १५ दिवसानंतर  -  ८ दुधाचे

     ३) २१ दिवसानंतर  -  २ कायमचे, ६ दुधाचे

     ४) ३० दिवसानंतर  -  ४ कायमचे, ४ दुधाचे

     ५) २ ते ३ वर्ष     -  ६ कायमचे, २ दुधाचे

  [१] ६) ३ ते ४  वर्ष     -  ८ कायमचे

  1. ^ शेती व पशुपालन. pune: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन विज्ञान आश्रम. 2012. p. 52.