जंगल तित्तिर
जंग्ल तित्तिर किंवा काळा तीतर (इंग्लिश: southern painted partridge; हिंदी:काला तितर)हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने गावतित्तिराएवढा असतो. याचा रंग काळा असतो, त्यावर ठिपके व पट्टे असतात. डोके व पंखांचा काही भाग गंजल्या सारखा तांबडा गळपट्टा नसतो. उडताना शेपटीच्या सुरुवातीचा काळा भाग दोन्ही बाजूना दिसतो. पंख काळसर तांबूस असतात. मादी नरापेक्षा वेगळी दिसते. तिचा गळा पांढरा असतो. ते एकटा किवा जोडीने आढळतात.
हा पक्षी भारतीय द्वीपकल्पात झुडपी जंगले ,गवती कुरणे आणि माळरानांवर आढळतो.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली