भोवत्या-छबिना

(छबिना या पानावरून पुनर्निर्देशित)

भोवत्या आणि छबिना हा कोकणातील पारंपारिक नृत्यप्रकार किंवा लोककला आहे.

भोवत्या आणि छबिना याचा अर्थ मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा घालत गोलाकार फेर धरत नाचणे होय.

स्वरूप

संपादन

कोकणामध्ये अनेक देव-देवतांचे उत्सव साजरे होतात. तेव्हा आरती झाल्यानंतर मंदिराच्या भोवताली अभंग किंवा भजन म्हणत देवाच्या पालखीसह प्रदक्षिणा घातली जाते. नंतर मंदिराच्या प्रांगणात फेर धरून एखाद्या पदाच्या तालावर पारंपारिक पद्धतीने नाचतात.

भोवत्या-छबिन्यातील म्हटली जाणारी काही पदे-

  • या रे या रे या रे या, नाव प्रभूचे गाऊ या | मंगल मूर्ती मोरया, आनंदाने नाचूया ||
  • गजानन पाय वंदाया, तुझा व्यवसाय तो आया | जुने बरवे दिवस गेले, पुढे आता कठीण आहे || अहो लोका करा धंदा, सोडून द्या या फुकट गमजा ||
  • मला लागलाय चटका, पंढरी अवघी भेटवा | चटका लागलाय जिभेला, पंढरी अवघी भेटावा ||
  • संसार भोवरा, भोवरा, फिरत असे गरागरा |
  • कोल्हापुरी अंबाबाईचे दारी, भिक्षा मागतो मागतो ब्रह्मचारी |
  • पंढरी, पंढरीस जाता कोणी, माझी विनवणी, हरीच्या कानी, जाउनी कोणी, जरा कुणी सांगा | निजला असेल तरी, कराबा जागा ||
  • शिवशंभो गणनाथ सरस्वती भावे, हरी भजनी रंगा यावे | पार्वती नंदना तुझे गुण गावे, हरी कीर्तनी रंगा यावे ||
  • हेरंब मोरया रिद्धीसिद्धी रमणा, अखंड वरदित प्रसन्न वदना | हेरंबा गणराया, तुझ्या कृपेची छाया मजवरी, गणराजा बा गणराया ||


ही पद्धत प्रामुख्याने कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यात आढळून येते.