चौधरी साधू राम (जन्म: जून २८, इ.स. १९२७) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फिल्लौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.