चोरीचा मामला

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित २०२० चा मराठी कॉमेडी चित्रपट

चोरिचा मामला हा एक २०२० सालचा मराठी कॉमेडी चित्रपट आहे जो प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित,अनिरुद्ध पाटील निर्मित आणि हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला.[] या सिनेमात जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर आणि हेमंत ढोमे क्षिती जोग मुख्य भूमिकेत दिसले आहेत.[] क्षिती जोग,

चोरिचा मामला
दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव
निर्मिती अनिरुद्ध पाटील
प्रमुख कलाकार

जितेंद्र जोशी
अमृता खानविलकर

हेमंत ढोमे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३१ जानेवारी २०२०



कलाकार

संपादन
  • हेमंत ढोमे
  • बाळचंद्र गायकवाड
  • क्षिती जोग
  • जितेंद्र जोशी
  • मुग्धा कर्णिक
  • अभिजित केंदे
  • अमृता खानविलकर
  • गीता पांचाळ
  • कीर्ती पेंढारकर
  • सारंगी ठाकूर
  • स्वारंगी ठाकूर
  • रमेश वाणी
  • अनिकेत विश्वासराव

नंदन हा एक असा चोर आहे, जो अत्यंत प्रामाणिक आणि समाधानी आहे. तो मुळात जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेपुरत्या वस्तूंचीच चोरी करत असतो. तो चोरी करण्याच्या ठिकाणची पूर्ण माहिती घेऊन पूर्ण नियोजन करून चोरी करत असतो. याच सोबत तो सदरील माहिती आपल्या पत्नीला देखील देऊन ठेवत असतो. एक दिवस तो अमरजित पाटील या तगड्या राजकारण्याच्या घरी चोरीसाठी जातो. पाटील नंदन ला रंगेहाथ पकडतात. तिथे पाटलासोबत त्याची मैत्रीण श्रद्धा देखील हजर असते. श्रद्धाला स्वतःचा गाण्यांचा अल्बम बनवायचा आहे आणि ती अमरजीतकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असते. पाटील नंदन ची खरडपट्टी काढत असताना दारावरची बेल वाजते. बाहेर पाटलाची पत्नी अंजली दार बडवत असते. बायकोच्या भीतीपोटी पाटील नंदनला श्रद्धाचा नवरा बनवण्याची विनंती करतो. मुळात पाटलाच्या पत्नीने आपल्या नवऱ्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर अभिनंदन यांना सोपवलेली असते. अंजली पाठोपाठ इन्स्पेक्टर अभिनंदन देखील तिथे येतो. या एकंदरीत परिस्थितीत जो गोंधळ उडतो, त्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.[]

  • अल्बम काढाल काय
  • ताणतणाव
  • चोरिचा मामला

संदर्भ

संपादन
  1. ^ SpotboyE. "'Choricha Mamla': Official Trailer Of This Jitendra Joshi, Amruta Khanvilkar, And Aniket Vishwasrao Starrer Comedy Marathi Film Out Now". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Choricha Mamla (2020) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2021-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ author/ajayparchure (2020-01-30). "Choricha Mamla Review: खळखळून हसवणारा". Lokmat. 2021-01-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

चोरिचा मामला आयएमडीबीवर

चोरिचा मम्ला ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर