हे चित्र विकिपीडियावरून काढून टाकावे. यातील लिखाणात दोन महत्त्वाच्या चुका आहेत. (१)’एकची’मधला ’ची’दीर्घ हवा. (२)’ तयां जाऊन उठवावे’ मधील ’या’वर अनुस्वार हवा. ’तया’ला हे एकवचन आणि ’तयां’ना हे अनेकवचन. अनुस्वार न दिल्याने अर्थ बदलतो. हा अनुस्वार (१९६२च्या) नव्या शुद्धलेखन नियमांनीसुद्धा काढून टाकलेला नाही.

मूळ कविता :

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावें

जगीं जे हीन अतिपतित, जगीं जे दीन पददलित तयां जाऊन उठवावें, जगाला प्रेम अर्पावें

जयांना कोणी ना जगतीं सदा ते अंतरी रडती तयां जाऊन सुखवावें, जगाला प्रेम अर्पावें

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथां साह्य ते द्यावें, जगाला प्रेम अर्पावें

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तयां जाऊन हसवावें, जगाला प्रेम अर्पावें

कुणा ना व्यर्थ शिणवावें, कुणा ना व्यर्थ हिणवावें समस्तां बंधु मानावें, जगाला प्रेम अर्पावें

प्रभूची लेकरें सारीं तयाला सर्वही प्यारीं कुणा ना तुच्छ लेखावें, जगाला प्रेम अर्पावें

असे जें आपणांपाशी, असे जें वित्त वा विद्या सदा तें देतची जावें, जगाला प्रेम अर्पावें

भरावा मोद विश्वात असावें सौख्य जगतात सदा हें ध्येय पूजावें, जगाला प्रेम अर्पावें

असें हें सार धर्माचें असें हें सार सत्याचें परार्थी प्राणही द्यावें, जगाला प्रेम अर्पावें

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा तयाने प्रेममय व्हावें, जगाला प्रेम अर्पावें


साने गुरुजी

Return to the file "Sane gujuji poem.JPG".