चित्रा बेडेकर (७ आॅगस्ट, १९४६ - १९ डिसेंबर, २०१८) या एक मराठी लेखिका होत्या. वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी लिखाण केले.

बेडेकर यांनी भौतिकशास्त्रात एम.एस्‌सी. केल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईत अध्यापन व नंतर पुणे येथील केंद्रीय संरक्षण खात्याच्या संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम केले. सुमारे ४० वर्षे त्या लोकविज्ञान चळवळ, ऑल इंडिया पीस अँड सॉलिडॅरिटी ऑर्गनायझेशन यांसाख्या सामाजिक-वैज्ञानिक संस्थांशी जोडल्या गेल्या होत्या. ह्याच काळात त्यांचे नियतकालिके आणि दैनिकांमधून बरेच लेखन प्रकाशित झाले.

मराठी पुस्तके

संपादन
  • अण्वस्त्रे, शस्त्रस्पर्धा आणि शांतता आंदोलन
  • अलेक्झांडर ग्रॅहम बेल (चरित्र, बालवाङ्मय)
  • अलेक्झांडर फ्लेमिंग (चरित्र, बालवाङ्मय)
  • आम्ही कशासाठी लढत आहोत? (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - भगतसिंग)
  • एड्स
  • माणुसकीच्या अल्याड-पल्याड (रोमॉं गारी यांच्या फ्रेंच पुस्तकावर आधरित)
  • मी नास्तिक का आहे? (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - भगतसिंग)
  • मेंदूच्या अंतरंगात (अनुवादित, डॉ. जिल टेलर या न्यूरोसायण्टिस्टला ब्रेनस्ट्रोकमुळे आलेल्या साक्षात्कारी अनुभवाची कथा; मूळ इंग्रजी - माय स्ट्रोक ऑफ इनसाइट)
  • विवेकानंदांचे सामाजिक-राजकीय विचार (अनुवादित पुस्तिका; मूळ लेखक -विनयकुमार रॉय)
  • विश्व वैज्ञानिक, अब्राहम लिंकन, डॉ राधाकृष्णन (३ पुस्तके एकत्रित)
  • शोधातल्या गमतीजमती
  • समाजवादाचे तत्त्वज्ञान (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - मॉरिस कॉर्नफोर्ड)
  • स्फोटकांचे अंतरंग
  • स्मरणचित्रे क्रांतिकारी शहीदांची (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - शिव वर्मा)

चित्रा बेडेकर यांचे विविध नियतकालिकांमधून आलेले व गाजलेले लेख

संपादन
  • अये बाले लीलावती (नियतकालिक - मिळून साऱ्याजणी, आॅगस्ट २००९)