चित्रपटगीत
चित्रपटामध्ये एकाहून अधिक गाण्यांचा समावेश केलेला असतो. ही गीते विविध गीतप्रकारांतील असतात. भूपाळी, वासुदेवाचे गाणे, भक्तिगीते, भावगीत, प्रेमगीत, कथा शास्त्रीय गीत, ठुमरी, दादरा, टप्पा असे उपशास्त्रीय प्रकार, कधी = नाट्यगीत, पाश्चात्त्य वळणाचे एखादे गाणे... इत्यादी एकाहून अनेक गीतप्रकार चित्रपटगीत या प्रकारात समाविष्ट केलेले असतात. चित्रपटातील कथेला, प्रसंगांना, घटनांना आनुषंगिक अशा प्रकारचे नियोजन असते. चित्रपटामधील गीते ही पूर्णपणे शास्त्रीय रागावर आधारलेली नसतात. कित्येक गीते ही आधारभूत रागावर आधारलेली असतात. असंख्य राग असुनही काही ठराविक रागांचाच वापर अधिक प्रमाणात केलेला दिसून येतो. विविध तालांचा उपयोग चित्रपट गीतामध्ये करतात, पुर्वीच्या काळी चित्रपट गीतांना संवादिनी, तबला, तानपुरा, वीणा, व्हायोलिन, बीन, सतार, सरोद बासरी, झांज, घुगरू, सनई... अशा वाद्यांची साथसंगत रोनी अलीकडे या वाद्यांबरोबर पाश्चात्त्य प्रकारच्या वाद्यांचीही साथ घेतली जाते.