एका किंवा एकाहून अधिक चित्रकारांच्या चित्रांवर आधारलेल्या नाट्यकृतीला चित्रनाट्य म्हणतात. चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवर आधारित चित्रगोष्टी हे नाटक आविष्कार नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणले आहे. त्यात २० कलाकार काम करतात. नाटकाची संकल्पना शांता गोखले यांची असून लेखन-दिग्दर्शन सुषमा देशपांडे यांचे आहे. या चित्रनाट्याचा पहिला प्रयोग पुण्यात १४ डिसेंबर २०१२ रोजी झाला.


पहा : नाटक