चिंचोली भोसे
चिंचोली भोसे हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील छोटे गाव आहे. पंढरपूरपासून जवळ असलेल्या या गावाची लोकसंख्या अंदाजे २,५०० आहे. या गावातून भीमा नदी वाहते. या गावात मारुतीचे मंदिर आहे. या गावत पहिली ते चौथीपर्यंतची मराठी शाळा आहे. या गावाला तंटामुक्ती पुरस्कार मिळाला आहे.