चिंचवड विधानसभा मतदारसंघ

चिंचवड विधानसभा मतदारसंघ - २०५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चिंचवड मतदारसंघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.३८ ते ५१, ५३, ६७ ते ७३ आणि ९१ ते ९५ यांचा समावेश होतो. चिंचवड हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाच्या आश्विनी लक्ष्मण जगताप ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०२३ आश्विनी लक्ष्मण जगताप भारतीय जनता पक्ष
२०१९ लक्ष्मण पांडुरंग जगताप भारतीय जनता पक्ष
२०१४ लक्ष्मण पांडुरंग जगताप भारतीय जनता पक्ष
२००९ लक्ष्मण पांडुरंग जगताप अपक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".