चार सूत्री भात लागवड
चार सूत्री भात लागवड हे भात पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठीचे प्रयोग होय. त्यात खालील सूत्रे मांडली गेली.
- पिक घेताना रोपाचा जो वाफा तयार करतात त्यावेळी भात तुसाची राख वापरणे
- रोपे दोरी घेऊन एका ओळीत लावणे
- रोपे १५-२५ सेमी अशा अंतरावर लावणे
- भात लावणी नंतर गोळीखत वापरणे
या चारसूत्री भात लावणीचे प्रयोग डॉ. सावंत यांनी १९९४-९५ पासून सुरू केले. ज्ञान प्रबोधिनीने याचे यशस्वी प्रयोग शिवगंगा व गुंजवणी खोऱ्यात केले.