चार्ली शीन
अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता
कार्लोस अर्विन एस्तेवेझ तथा चार्ली शीन (सप्टेंबर ३, इ.स. १९६५ - ) हा अमेरिकन चित्रपटअभिनेता आहे. याने प्लाटून, फेरिस ब्युलर्स डे ऑफ, वॉल स्ट्रीट, यंग गन्स, एट मेन आउट, मेजर लीग, हॉट शॉट्स!, द थ्री मस्केटियर्स, मनी टॉक्स, बिइंग जॉन माल्कोविच सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांतून काम केले आहे.
याचे वडील मार्टिन शीन तसेच भाऊ एमिलियो एस्तेवेझ, रमोन एस्तेवेझ आणि बहीण रेने एस्तेवेझ हे देखील चित्रपटअभिनेते आहेत.