इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमध्ये कधीकधी एखाद्या मुळाक्षराचे द्वित्त असते. अशा वेळी ते द्वित्त बहुधा अ‍ॅक्सेंट दाखविण्यासाठी असते, असा माझा समज आहे. असे द्वित्त अक्षरांचे जोडव्यंजनासारखे उच्चारण होत नाही. उदा० Cutting चा उच्चार ’कटिंग असा होतो, कट्टिंग नाही.. स्पेलिंग जर Cuting केले तर उच्चार क्यूटिंग होईल.ते टाळण्यासाठी टी डबल होतो. याच नियमाने Buter, Gining, यांचे उच्चार अनुक्रमे ब्यूटेर आणि गायनिंग होतील. तसेच Ocurence चा उच्चार सी आणि आर यांची द्वित्ते न केल्याने ऑक्युअरेन्स असा होईल, आणि Materचा मेटर.

अ‍ॅटोमीटर हा शब्द तामिळ असता तर त्याचे लिखाण अ‍ॅट्टोमीटर असे चालले असते. परंतु हा शब्द इंग्रजी आहे. नवीन असल्याने प्रस्थापित कोशांत त्याचा लिखित IPA उच्चार सापडू शकला नाही. कुणाला सापडला तर नक्की लिहून कळवावा, आणि मग वाटल्यास प्रस्तुत लेखाचे नाव बदलावे. गरज पडल्यास झेट्टॅमीटर आणि यॉट्टॅमीटर या पानांची नावेही बदलून योग्य अशी करावीत.....J (चर्चा) २३:५६, १४ सप्टेंबर २०१३ (IST)Reply

"ॲट्टोमीटर" पानाकडे परत चला.