चर्चा:होमिओपॅथी

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by अमृत रामचंद्र पवार in topic लेखाचे नाव

अशास्त्रिय लेखन

संपादन

प्रस्तुत लेख अत्यंत अशास्त्रिय पद्धतीने लिहीला गेला आहे हे उघड आहे. होमिओपॅथीच्या समर्थकांनी हा लेख लिहीला हेही दिसते आहे. त्यामुळे संपूर्ण लेख नव्याने लिहीण्याची गरज आहे.

स्नेहल शेकटकर १८:४७, २९ ऑगस्ट २०१५ (IST)

चुकीची माहीती

संपादन

वैज्ञानिक तथ्यांची मोडतोड करणारी खालील काही वाक्ये सदर लेखात लिहीण्यात आली आहेत. मी ती काढून टाकत आहे आणि त्यासाठीची कारणे मी खाली देत आहे.

"इ.स. २००८ सालचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या डॉ. ल्यूक माँतेनर नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने जुलै इ.स. २०१०मध्ये असा शोध लावला की, एका द्रावणात जर कुठल्याही आजाराचे विषाणू किंवा जिवाणूंचे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या (डीएनए)च्या असतील तर ते द्रावण एक प्रकारच्या हलक्या पद्धतीच्या विद्युत चुंबकीय लहरी त्या पाण्यात सोडते. या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे त्या द्रावणातील आजूबाजूच्या पाण्यातील अणुरेणूंची रचना अतिसूक्ष्म संरचनेत बदलते. या शास्त्रज्ञाने असेही संशोधन केले की, हे उरलेले पाणीही मग अशाच प्रकारच्या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरी सोडते. यावरून असे अनुमान काढले जाते की, एखादे द्रावण जर कितीही पाणी मिसळून अतिविरळ करण्यात आले आणि त्या द्रावणातील मूलभूत गोष्टींचे डीएनए जरी दिसू शकले नाहीत, तरीही हे पाणी त्या मूलभूत घटकांच्या सर्व गुणधर्माचे अस्तित्व स्मरणात ठेवून त्या प्रकारच्या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात दाखवू शकते. डॉ. ल्यूक माँटेनर यांनी ‘स्मरणात ठेवून हा शब्द वापरून या क्षेत्रात क्रांतिकारक माहिती सादर केली आहे."

अशा प्रकारे तथ्याची जाणिवपूर्वक मोडतोड विकिपीडियावर अपेक्षित नाही. वरील लेखनासाठी कोणतेही संदर्भ देण्यात आलेले नाहीत. इंग्रजी विकिपीडियावरून मी याविषयीचे संदर्भ मिळवले आणि या शास्त्रज्ञाने याविषयी प्रसिद्ध केलेल्या संशोधनपत्रिकादेखिल तपासल्या. (http://link.springer.com/article/10.1007%2Fs12539-009-0059-0 आणि http://link.springer.com/articlए/10.1007%2Fs12539-009-0036-7). या पत्रिकांमध्ये असे कोठेही म्हटले नाही की "हे उरलेले पाणीही मग अशाच प्रकारच्या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरी सोडते". त्याचप्रमाणे या लेखात असेही अनुमान काढले गेले नाहीये की "एखादे द्रावण जर कितीही पाणी मिसळून अतिविरळ करण्यात आले आणि त्या द्रावणातील मूलभूत गोष्टींचे डीएनए जरी दिसू शकले नाहीत, तरीही हे पाणी त्या मूलभूत घटकांच्या सर्व गुणधर्माचे अस्तित्व स्मरणात ठेवून त्या प्रकारच्या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात दाखवू शकते". स्वत: माँतेनरने अशा मतांचे खंडन केले आहे. त्याचप्रमाणे काहीही मूळ नसताना पाण्याने विद्युत चुंबकीय लहरी सोडत राहाणे भौतिकशास्त्राच्या उर्जा अक्षय्यतेच्या नियमाच्या विरोधात आहे. अशा प्रकारे मूळ संशोधनात नसलेल्या गोष्टी आपल्या सोयीसाठी विकिपीडियावर लिहीणे हे विकीपीडियाच्या आचारसंहितेमध्ये न बसणारे आहे.

याचबरोबर हे संशोधन अनेक इतर शास्त्रज्ञांच्या टिकेचे लक्ष्य झाले आहे आणि नंतर कोणाही संशोधन करणाऱ्या व्यक्तिला या संशोधनाची पुनरावृत्ती करता आलेली नाही हेदेखील लेखकाने सोयिस्करपणे लिहीणे टाळाले आहे. नोबेल पारितोषिक विजेत्याने नंतर केलेले सर्व संशोधन बरोबर असते हा समज अत्यंत चुकीचा आहे.

यानंतर खालील वाक्ये लिहीली आहेत.

"ऑक्टोबर इ.स. २०१० मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या डॉ. जयेश बेल्लारे आणि त्यांचे विद्यार्थी प्रशांत चिक्रमाने यांनी मुंबईच्या आयआयटीमध्ये संशोधन करून असेच काही निष्कर्ष काढले. होमिओपॅथीच्या पोटेन्सी असलेल्या गोळ्यांमध्ये ते औषध ज्या मूलभूत घटकांपासून केलेले असते त्यांचा अतिसूक्ष्म अंश असतो आणि ते सिद्ध करता येऊ शकते. हा शोध निबंध इ.स. २०१० मध्ये प्रसिद्ध झाला."

हा शोधनिबंध कुठल्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला? त्यावर इतर संशोधकांची मते काय आहेत? इतरत्र झालेल्या प्रचंड संशोधनांमध्ये असा अंश नसतो हे सिद्ध झाले आहे. त्यांपैकी एकाही संशोधनाचा उल्लेख येथे का नाहीये? होमिओपॅथीचे तोकडे समर्थन करण्याचा हा प्रयत्न माझ्यामते हास्यास्पद आहे.

स्नेहल शेकटकर १३:३२, ३० ऑगस्ट २०१५ (IST)

लेखाचे नाव

संपादन
या लेखाच्या नावाचे मराठीकरण सूक्ष्मउपचार पद्धती होऊ शकते का ?--अमृत रामचंद्र पवार (चर्चा) १६:४९, १५ डिसेंबर २०१५ (IST)Reply


नाही होऊ शकत. उपचार पद्धतीचे शाश्रीय नाव असते सचिन २०:१९, १३ जानेवारी २०१९ (IST)

"होमिओपॅथी" पानाकडे परत चला.