चर्चा:हिंदु मिथकशास्त्र

मिथकशास्त्र हा शब्द बहुधा मायथॉलॉजीसाठी वापरलेला दिसतो आहे. हिंदु पुराणे आणि शास्त्रे वेगळी आहेत. त्यामुळे हिंदु मायथॉलॉजी म्हणजेच पुराणे. इथे लॉजीचा अर्थ शास्त्र होत नाही. आणि हिंदु पुराणांचे काही वेगळे असे शास्त्र नाही. त्यामुळे हिंदु मिथकशास्त्र हा शब्द योग्य वाटत नाही. शास्त्रांमध्ये अर्थशास्त्र(म्हणजे पोलिटिकल सायन्स), कल्पसूत्रे(ग्रंथसंगतिशास्त्र) कामशास्त्र, काव्यशास्त्र, तंत्रशास्त्र, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, नाट्यशास्त्र(यात अभिनय, नृत्य, संगीत आले), न्यायशास्त्र(तत्त्वज्ञान), निरुक्त(इटिमॉलॉजी), मानसशास्त्र, मीमांसा(वेदवाक्यांची छाननी करण्याचे शास्त्र), योगशास्त्र, वास्तुशास्त्र, व्याकरणशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र इत्यादींचा समावेश होतो. ---J--59.95.20.149 १४:०८, ४ ऑगस्ट २००८ (UTC)

"हिंदु मिथकशास्त्र" पानाकडे परत चला.