चर्चा:सूर्यसिद्धान्त

आपले एक सदस्य जे यांनी रससिद्धान्त या पानावर मांडलेल्या सूचनेप्रमाणे सूर्यसिद्धान्त हे पान न त ला जोडून असे बनवले होते. हे योग्य नसल्यास त्यावर नक्की धोरण काय आहे ते स्प्ष्ट व्हावे. जे यांचे म्हणणे व्याकरणदृष्ट्या मला योग्य वाटतो म्हणून कृपया सूर्यसिद्धांत हे पान सूर्यसिद्धान्त येथे रिडायरेक्ट करावे. जे यांचा रससिद्धान्त या पानावर दिलेला प्रतिसाद खालील प्रमाणे आहे. - मराठीतले सिद्धान्त, देहान्त, वेदान्त, शालान्त, कांडान्त, शोकान्त, जन्म, वाङ्मय, विषण्ण, अन्न, धम्म, निम्न, मृण्मयी वगैरे शब्द नासिक्य व्यंजनाऐवजी अनुस्वार वापरून लिहिता येत नाहीत; लिहिल्यास वेगळे अर्थ होण्याचा धोका असतो. तद्वतच, हंस, संयम, किंवा, संरक्षण, संहिता, संलग्न असले शब्द अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरून लिहिता येत नाहीत. ' भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात रस, रसनिष्पत्ती, रससूत्र, रसास्वाद, रसप्रक्रिया, रसविघ्ने, रसग्रहण, रसध्वनी वगैरे गोष्टींचा सांगोपांग विचार केला आहे. आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त यांनी रसाभासाची कल्पना मांडली. काव्यशास्त्रातल्या या प्रकाराला रससिद्धान्त असे म्हणतात. --J १९:५८, १ मार्च २०११ (UTC)

अभय त्वरित कार्यवाही बद्दल धन्यवाद! :)
"सूर्यसिद्धान्त" पानाकडे परत चला.