चर्चा:सुधीर फडके
moved from सुधीर फडके
हे सुप्रसिद्ध भारतीय गायक-संगीतकार होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला. मराठी संगीत रसिक त्यांना 'बाबूजी' या नावाने ओळखतात. ते त्यांच्या मराठी भाषेतल्या सांगितिक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काही चित्रपटांना संगीत दिले आहे. मराठे चित्रपटसृष्टी आणि 'सुगम-संगीत' या दोन क्षेत्रांमधे सातत्याने ५ दशके त्यांनी एकमाद्वीतीय अशी कामगिरी केली आहे. संगीत क्षेत्राबरोबरच ते त्यांच्या प्रखर राष्ट्रभक्तीसाठीही प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. १९४५ पासून पुढे जवळपास अर्ध शतक त्यांनी मराठी संगीतक्षेत्रामधे अधिराज्य गाजवल.
जन्म आणि सरूवातीची काही वर्षे
सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव राम फडके होते. त्यांच्यावर पहिले सांगितिक संस्कार कोल्हापूरच्या पाध्येबूवांकडून झाले. शास्त्रीय संगीताचा पाया त्यांच्या गायकीला याच वयात मिळाला. पुढे नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईला गेले. परंतु खडतर नशिबांच्या फेर्यामुळे त्यांना पोटा-पाण्यासाठी हातात बाजाची पेटी घेऊन भारतभ्रमंती करावी लागली. या प्रवासात त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले आणि त्यातून त्यांना खूप शिकायला मिळाले. लढाऊ बाणा, श्रवणभक्ती आणि अनेक मैफीलींमधले विविध अनुभव यातूनच त्यांच्या संगीत प्रतिभेला नवी झळाळी प्राप्त झाली.
पुढे कोलकत्यामधील 'एच. एम. व्ही' या संगीत कंपनीमधे त्यांना नोकरी मिळाली. त्यांनंतर सुटीसाठी ते कोल्हापूरला आले असताना, एका प्रदीर्घ आजाराने त्यांची कोलकत्यातील नोकरी गेली. पुनःप्रयत्नांनंतर त्यांनी सोळांपूरकर मास्तरांच्या संगीतसमूहामधे गायक-संगीतकार काम करण्यास सुरूवात केली. तिथेच त्यांची भेट मराठी काव्यक्षेत्रातील 'आधुनिक वाल्मिकी' गौरवल्या गेलेल्या ग.दि. माडगूळकर यांच्याशी झाली.
चित्रपट कारकीर्दः
एच्.एम. व्ही. ग्रामोफोन या कंपनीने प्रथम सुधीर फडके यांना दिग्दर्शक राम गबाले यांच्या वंदे मातरम याचित्रपटास संगीत दिले. त्यांच्या गायकीवर त्यांच्या समकालीन भावगीत गायक गजानन वाटवे यांचा प्रभाव होता. गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव आणि केशवराव भोळे या संगीतकारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, संगीतकार ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या तिघांनी मिळून पुढील बरीच वर्षे मराठी चित्रपटसृष्टीला एकाहून एक सरस चित्रपट दिले. त्याची सुरूवात 'पहिलं पाऊल' य चित्रपटाने झाली. हिंदीमधे 'आगे बढो' आ चित्रपटासहित जवळपास २० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
Start a discussion about सुधीर फडके
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve सुधीर फडके.