चर्चा:सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन

हिंदीप्रभावित व कृत्रिम भाषाशैली

संपादन

या लेखातील मजकुराची भाषाशैली हिंदीप्रभावित वाटत असून नैसर्गिक/ओघवत्या मराठीत वाटत नाही. हा लेख हिंदीतून शब्दशः भाषांतरित केला असावा किंवा यांत्रिक-अनुवाद (मशीन-ट्रान्सलेशन) वापरून लिहिला गेला आहे की काय, अशी शंका मनात उद्भवते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५१, १६ जुलै २०११ (UTC)

संकल्प , शब्दशः अनुवाद आणि नॉन रेसिडेंट महाराष्ट्रीय/ हिंदी प्रदेशातराहीलेल्या अथवा इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेया मराठी व्यक्तीचे व्यक्तिचे बर्‍याच खंडानंतर मराठी भाषेत लेखन केलेले असावे त्यामुळे तुम्हाला तसे वाटणे सहाजिक आहे ,हा मशिनी अनुवाद नाही हे निश्चित.शिवाय टंकन बहुधा मराठी विकिपीडियाची सुविधा वापरून केले आहे असे वाटते. माझ्या मतानुसार आपण अशाही लेखनाचे स्वागत करून त्यांना मराठी विकिपीडियात सामावून घेण्याचा प्रयत्न करावयास हवा माहितगार १८:४०, १६ जुलै २०११ (UTC)
नमस्कार. मी ह्या लेखाचा शब्दकोष वापरून ईंग्रजीतून अनुवाद केला आहे, म्हणून कदाचित अनेक शब्द विचीत्र वाटत आहेत. ह्याची मी माफी मागतो, माझी मराठी फारच कच्ची आहे. माझी ही विनंती आहे की आपल्याला जिथेही अशुद्धलेखन दिसून येईल, तिथे ताबडतोब दुरूस्ती करण्यास सुरू करा. मी गूगल डिक्शनरी व तामिळक्यूब वापरत आहे, जर आपल्याला आणखीन चांगले शब्दकोष माहीत असतील, तर कृपा करून मला कळवावे. मंजुशाका ०४:४२, १७ जुलै २०११ (UTC)

मराठी उच्चार

संपादन

मराठीत Gain, Plain, main आदी शब्दांचे उच्चार अनुक्रमे गेऽन्‌, प्लेऽन्‌ आणि मेऽन्‌ असे केले जातात. लिहिताना हलन्त चिन्ह व अवग्रह चिन्ह गाळले जाते. त्यामुळे हा लेख "सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन" या मथळ्याखाली स्थानांतरित करीत आहे....J ०६:००, १७ जुलै २०११ (UTC)

मला ही आधी शंका होती, पण ही धारावाहीक जापानी आहे, व त्यात 'Lain' हा इंग्रजी शब्द नसून एक बनवलेला जापानी शब्द आहे, ज्याचे उच्चार जापानी मध्ये लेईन 'le-i-n' असे केले गेलेले आहे. मंजुशाका ०७:०९, १७ जुलै २०११ (UTC)

इंग्रजी शब्दकोशात

संपादन

इंग्रजी-इंग्रजी शब्दकोशांतसुद्धा उच्चार (Leɪn)ले-इन्‌ असा दिलेला असतो. पण हाच उच्चार इंग्रजी-मराठी कोशांत लेऽन्‌ असा दाखवतात. जपानी उच्चारानुसारी लेखन करायचे म्हटले तर, जपानीतले अनेक उच्चार देवनागरीत लिहिताच येणार नाहीत. इंग्रजी विकीवर असलेच एक पान आहे, तिथे Lain असा शब्द आहे. तथाकथित जपानी उच्चाराप्रमणे त्यांनी Lay-een असे लिहायला हवे होते....J ०९:५४, १७ जुलै २०११ (UTC)

जपानीतले अनेक उच्चार देवनागरीत लिहिताच येणार नाहीत, हा वाक्य मला बरोबर वाटत नाही. माझ्या मते जपानी भाषेतील सर्व उच्चार देवनागरीत लिहीणे शक्य आहे. चीनी बाबतीत म्हणने शक्य नाही. ते सोडल्यास आपण बरोबर आहात. :) मंजुशाका १०:१३, १७ जुलै २०११ (UTC)

परभाषिक उच्चार

संपादन

जगातल्या एका भाषेतील सर्वच्या सर्व उच्चार क्वचितच दुसर्‍या भाषेच्या लिपीत लिहिता येतात. इंग्रजीमध्ये T चा ते अक्षर शब्दारंभी आले तर ट आणि ठ च्या दरम्यानचा होतो आणि मध्ये आलेते ट आणि त च्या दरम्यान असतो. हे उच्चार मराठीत लिहिता येतील? इंग्रजीत V आणि W चे उच्चार एकसारखे नाहीत. उच्चारांतील फरक दाखवण्यासाठी मराठी माणसे V चा उच्चार व्ही करतात, तर बंगाली भी करतात. लिहितानाही अनुक्रमे व्हिक्टरी आणि भिक्टरी लिहिले जाते. तामीळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, आणि फ, ब, भ ही मुळाक्षरे नाहीत. पण ए, ओ, ळ आणि ण ही अक्षरे दोनदोन आहेत. त्यांचे दोन ए आणि ओ आपण कदाचित स्वतंत्र उच्चारू शकू पण दोन णंचा वेगवेगळा उच्चार करणे महाकर्मकठीण आहे. उर्दूत ५ज, ३स, २त, २ क-ख-ग-ड-फ-ह-अ आहेत. त्यांतले काहींचे उच्चार मराठी माणसांना जमतील आणि कदाचित मराठीत लिहिता पण येतील, पण मग ही सर्व अक्षरे लिहिण्यासाठी मराठीत मुळाक्षरे कुठून आणणार? हिंदीतला कैफ या शब्दाचा उच्चार मराठीत लिहिता येत नाही, हिंदीत चव्हाण लिहिता येत नाही. साधे फ्रेन्च आणि स्पॅनिश आणि स्वीडिश उच्चार इंग्रजीत लिहिता येत नाहीत, तर एकूणएक जपानी उच्चार मराठीत लिहिता येतील हे पटणे जरा कठीणच आहे.

Anime is commonly defined as animation originating in Japan. (アニメ?, an abbreviated pronunciation in Japanese of "animation", pronounced anime in Japanese, but typically /ˈænɨmeɪ/ or /ˈɑnimeɪ/ in English. The definition sometimes changes depending on the context. In English-speaking countries, anime is also referred to as "Japanese animation".

थोडक्यात काय तर अ‍ॅनिमे(किंवा आनिमेइ) हे अ‍ॅनिमेशनचे लघुरूप आहे. तेव्हा अ‍ॅनिमेशनमध्ये दुरुस्ती करून अ‍ॅनिमे करायची गरज नव्हती. असे करणे म्हणजे मिस्टर खोडून एम्‌आर्‌ लिहिण्यासारखे आहे. जेव्हा विशेष नाम असेल तेव्हा अ‍ॅनिमे लिहायला हरकत नाही पण सामान्य नामाच्या ठिकाणी अ‍ॅनिमेशन असायला हवे.(उदा० विशेष नाम Kwality आणि सामान्य भाववाचक नाम Quality.)...J १३:१३, १७ जुलै २०११ (UTC)

तुम्ही जे म्हणत आहात ते मला मान्य आहे, पण मला स्वतःला जपानी भाषा येते, व मी सांगू शकतो की जपानी भाषेत अशे कोणतेही उच्चार नाही आहेत जे देवनागरीत लिहीले जाऊ शकत नाही. ह्याचे उळट खरे नाही - देवनागरीतले जास्त करून उच्चार जपानी मध्ये लिहीणे शक्य नाही. हा लेख पहा: http://en.wikipedia.org/wiki/Japanese_phonology
अ‍ॅनिमे (जे खरे तर आनिमे असायला हवे) हे अ‍ॅनिमेशनचे लघुरूप नाही आहे. अ‍ॅनिमे हा एक जपानी शब्द आहे ज्याचे मूळ हे इंग्रजी शब्द अ‍ॅनिमेशन आहे. जपानी भाषेत इंग्रजी शब्दांचा लघुरूप करण्याच्या पद्धतीमुळे तो निर्माण झाला आहे. जपान मध्ये ह्या शब्दाचा वापर सर्व अ‍ॅनिमेशनसाठी केला जातो, पण बाकीच्या जगात तो खास जपानी अ‍ॅनिमेशनच्या एका सुस्पष्ट प्रकारासाठी वापरला जातो. कारण सर्व अ‍ॅनिमे हे अ‍ॅनिमेशन आहे, पण अ‍ॅनिमेशन हे अ‍ॅनिमे नाही, आपल्याला हे सांगणे महत्तवाचे आहे की कोणती मालीका अ‍ॅनिमे आहे की नाही. अ‍ॅनिमेचा इंग्रजी लेख पूर्ण वाचा. मंजुशाका १४:३८, १७ जुलै २०११ (UTC)

देवनागरीत जपानी

संपादन

जपानी भाषेतले सर्व उच्चार मराठीत लिहिता येत असतील तर ही गोष्ट मराठीसाठी अभिमानस्पद आहे. परंतु मला मात्र, जपानी फ़ॉनॉलॉजी या लेखावरून तसा निष्कर्ष काढणे जमले नाही. याउलट लेखाच्या शेवटच्या वाक्याने जपानी उच्चार मराठीत लिहिणे अतिशय अवघड असले पाहिजे असे जाणवले. ते वाक्य असे आहे. : Standard Japanese has a distinctive pitch accent system: a word can have one of its moras bearing an accent or not. An accented mora is pronounced with a relatively high tone and is followed by a drop in pitch. The various Japanese dialects have different accent patterns, and some exhibit more complex tonic systems.

मराठी शब्दांत आघात क्वचितच आहेत, साहजिकच स्वराघात असलेली भाषा मराठीत लिहिता येणे अवघड आहे....J ०७:२९, १८ जुलै २०११ (UTC)
जपानीत स्वरआघाताचा अनधिकृत वापर केला जातो, व तसा न वापरला तरीही भाषेत चूक होत नाही. लिहील्या जाणार्या जपानी भाषेत स्वरआघात चिन्हाकृत केला जात नाही, व त्याप्रमाणे रोमन लिपीत अक्षरांतर करत असताना सुद्दा लिहीला जात नाही. असे व्हियेतनामी, चिनी किंव्हा थाई बाबतीत म्हणणे शक्य नाही, जिथे स्वरआघाताचे चिन्ह न लिहीता भाषा चुकीची होउन जाते. जपानी भाषा कमी संख्येत व सोपे उच्चार वापरण्यासाठी प्रसिद्द आहे. मंजुशाका १०:५६, १८ जुलै २०११ (UTC)
"सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन" पानाकडे परत चला.