चर्चा:सिव्हिलायझेशन ५

लेखाचे नाव

संपादन

'सिव्हिलाइजेशन'च्या बदली मी 'सिव्हिलिजेशन' वापरण्यापूर्वी मी इंग्रजी विक्शनरीचा सल्ला घेतलेला. कारण हा अमेरिकन खेळ आहे व ह्याचे इंग्रजी स्पेलिंगसुद्धा अमेरिकन इंग्रजीत लिहिलेले जाते ('Civilisation' न्हवे, 'Civilization'), त्याचे मुळ उच्चारसुद्धा आपण अमेरिकन धरावे.

देवनागरी लिपीत आई.पी.ए उच्चार 'z' साठी 'ज' अक्षर वापरला जातो. 'झ' चा उच्चार आई.पी.ए मध्ये 'zʱ' असा केला जातो. यामुळे आपण 'झ' च्या जागी 'ज' वापरावा असे मला योग्य वाटते.

या शब्दाच्या ब्रिटिश उच्चाराचे आई.पी.ए लिप्यंतरण पाहिले (/sɪvəlɨˈzeɪʃən/), तर त्यात eɪ वापरले आहे, aj न्हवे. अशा वेळी आपण 'आय' जागी 'ए' वापरायला हवा (ɪ साठी अक्षर मराठीत नसल्यामुळे).

शेवटी मला असे वाटते की आई.पी.ए च्या अनुसार आपण 'सिव्हलिजेशन' असे लिप्यंतरण वापरायला हवे. Sabretooth १३:२५, ११ जानेवारी २०१२ (UTC)

थोडक्यात

संपादन

सिड मायर्स सिव्हलिजेशन ५ ला थोडक्यात सिव्हलिजेशन ५ म्हणतातच, व सिव्ह ५ असे सुद्धा प्रसिद्ध आहे. ते दोन्ही आपण लेखात ठेवावे. Sabretooth १३:३१, ११ जानेवारी २०१२ (UTC)

संस्कृती व सभ्यता

संपादन

खेळात दोन महत्त्वाच्या संज्ञा म्हणजे Culture आणी Civilization. मी यांसाठी मराठी अनुवाद म्हणून 'सभ्यता' व 'संस्कृती' असे निवडले. जर आपण Civilization ला संस्कृती म्हणून म्हटले, तर Culture साठी एक विशेष शब्द सुचवायला लागेल, नाहीतर वाचक गोंधळतील. Sabretooth १३:४४, ११ जानेवारी २०१२ (UTC)

"सिव्हिलायझेशन ५" पानाकडे परत चला.