चर्चा:सर्वेपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारतातील ज्ञानी पुरुष आणि तत्वज्ञ म्हणुन आपण त्यांना ओळखतो. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणुन त्यांना ओळखले जाते. अशी तेजस्वी, ओजस्वी, आणि मनस्वी व्यक्तिमत्व भारतीय मनांना स्फूर्ती आणि प्रेरणा देतात. अवघ्या विश्वालाच या महान व्यक्तीने आपली "शाळा" मानलं होतं नि आपल्या आयुष्याला "शिक्षण". त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाने भावूक झालेल्या लता दिदीनीही परवा ट्विटर लिहिलं की, २७ जानेवारी १९८३ ला मी त्यांना भेटले एका व्यक्तीने कसं राहिलं आणि वागलं पाहिजे या विषयाचा कानमंत्रच या भेटीत आपल्याला मिळला. मी भाग्यवान आहे की साधी राहणी आणि उच्चविचार सरणी असणारे राधाकृष्णन गुरु म्हणुन प्रेरणा देत राहिले. असं लिहून त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचा केलेला गौरव तुमच्या आमच्या मनातील त्यांची प्रतिमा उजळवून टाकणारा आहे. श्री. राधाकृष्णन यांचं व्यक्तीत्व हे भारतीयत्वाने परिपूर्ण बनलेलं होतं. त्यांचे आचार, विचार हे भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणारे होते, म्हणूनच महान तत्वज्ञ ही त्यांची ओळख खऱ्या अर्थाने सार्थ ठरते. त्यांच्या मते सगळ्यात अधिक बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीने शिक्षक होऊन समाजाची सेवा केली तर एक सुविद्य समाज निर्माण होतो. आदर हा नुस्त शिक्षक होऊन मिळत नाही तर तो कमवावा लागतो ही त्यांची विचारधारा होती.त्यांच्या विद्यार्थ्यान वरील प्रेमाचा एक किस्सा कायम सांगितला जातो. आपल्या पदाशी निगडीत असणाऱ्या सर्व संकेतांना डावलून त्यांनी कोटा, राजस्थान येथील आपल्या शिष्यांना भेट दिली होती.त्यांच्या या विद्यार्थ्यांवरील वरील प्रेमाने त्यांचे 'शिक्षक'पण अधोरेखित होते. नुस्ती माहिती देणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर समर्पण, प्रेम आणि परंपरेचा मान राखणारी सुजन मन तयार करणं ही शिक्षकाची खरी भूमिका असल्याचा त्यांनी आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलं आहे. आजकाल तंत्रज्ञानामुळे जग छोटं होत चाललेलं असताना माणसाच्या मनानं मोठ होण्याची गरज निर्माण झाली आहे, नाहीतर संघर्ष अटळ आहे. असं सांगणाऱ्या त्यांच्या विचारांची जपणूक करण्याची तीव्र गरज आज निर्माण झाली आहे. एक आदर्श व्यक्ती आणि एक आदर्श शिक्षक म्हणुन त्यांचे भारतीय शिक्षण पद्धती प्रती असणारे योगदान अवर्णनीय आहे.

"सर्वेपल्ली राधाकृष्णन" पानाकडे परत चला.