सतिबंदी करणारा महानुभाव पंथ

कामाइसा सती प्रकरण यादव सम्राट रामचंद्रदेवाची राणी कामाइसा होती. रामचंद्रदेवाच्या मृत्युनंतर तिने सती जावे अशी तिच्यावर सक्ती करण्यात आली. पण तिला नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाचा उपदेश होता. 'पिंडहनन केलेया ब्रह्मांडहनन होए' (श्री चक्रधरोक्त सुत्रपाठ विचार सूत्र ६८) वचनानुसार तिने सती जाण्याचे नाकारले. रामचंद्रदेवाचा पुत्र सिंघणदेव तृतीय याला ती म्हणाली 'मज सत्त्व नाही: मी तुझिये भानवसीचा ठोंबरा खाऊन असैनः'(स्मृतीस्थळ क्र.१४९,१५०) तिला सती जावेच लागले. पण नागदेवाचार्यांचा अभिप्राय तिला आत्महत्येचे नरक होणार नाहीत असाच पडला. धर्मवार्तेसाठी विष, वाघवळ, सूरी, पाटी आदि साधनांनी आत्महत्या केल्यास आत्महननरूप मळ लागतो पण ते कर्म वाया जात नाही मात्र असे जर अविद्येकारणे केले तर मात्र नरक होतात असाही त्यांचा अभिप्राय आहे.

सतीप्रथा संबंधी चक्रधर स्वामींनी पहिला विचार मांडला आहे. संपादन

सतीप्रथा संबंधी चक्रधर स्वामींनी पहिला विचार मांडला आहे. Jamodekar (चर्चा) ००:२४, २१ ऑक्टोबर २०२२ (IST) सतिबंदी करणारा महानुभाव पंथReply

कामाइसा सती प्रकरण यादव सम्राट रामचंद्रदेवाची राणी कामाइसा होती. रामचंद्रदेवाच्या मृत्युनंतर तिने सती जावे अशी तिच्यावर सक्ती करण्यात आली. पण तिला नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाचा उपदेश होता. 'पिंडहनन केलेया ब्रह्मांडहनन होए' (श्री चक्रधरोक्त सुत्रपाठ विचार सूत्र ६८) वचनानुसार तिने सती जाण्याचे नाकारले. रामचंद्रदेवाचा पुत्र सिंघणदेव तृतीय याला ती म्हणाली 'मज सत्त्व नाही: मी तुझिये भानवसीचा ठोंबरा खाऊन असैनः'(स्मृतीस्थळ क्र.१४९,१५०) तिला सती जावेच लागले. पण नागदेवाचार्यांचा अभिप्राय तिला आत्महत्येचे नरक होणार नाहीत असाच पडला. धर्मवार्तेसाठी विष, वाघवळ, सूरी, पाटी आदि साधनांनी आत्महत्या केल्यास आत्महननरूप मळ लागतो पण ते कर्म वाया जात नाही मात्र असे जर अविद्येकारणे केले तर मात्र नरक होतात असाही त्यांचा अभिप्राय आहे.

"सती (प्रथा)" पानाकडे परत चला.