अग्निचयनासाठी रचलेल्या वेदींमध्ये गरुडाकार आकाराची हजारो विटा वापरून रचलेली वेदी प्रसिद्ध आहे. या वेदीमध्ये कमलपत्रावर सोन्याची तबकडी ठेवून त्यावर हिरण्यमय पुरुष म्हणजे सोन्याची मनुष्याकार मूर्ती स्थापत. अग्निचयनात शतरुद्रीय होम असतो. एवंच रुद्र, कमलासन, व गरुडपक्षी यामध्ये ब्रह्मा, विष्णु महेश या तीनही देवतांच्या उपासनेची लाक्षणिक सुरुवात येथे दिसून येते.हिरण्मय पुरुष आदित्यातील पुरुषतत्त्व होय असे शतपथ ब्राह्मणातील मंडलब्राह्मणात आंगितले आहे.

शांखायन ब्राह्मणाच्या मैत्रायणी संहितेत एका महान देवाची उत्पत्ती सागितली आहे. उत्पन्न झाल्याबरोबर त्याने प्रजापतीला आपले नाव ठेवायला सांगितले. भव, शर्व, पशुपती, उग्रदेव, महदेव, रुद्र, ईशान व अशानि अशी आठ नामे मागून घेतली. जल, अग्नि, वायु वनस्पती आदित्य, चंद्रमा, अन्न, व इंद्र हेच क्रमाने त्या नामांनी सांगितले आहे. शतपथ ब्राह्मणात हीच कथा (६।१।३।१-२०) किंचित फरकाने आली आहे. त्यात कुमार हे रुद्राचे नववे नाव सांगितले आहे आणि पुढे म्हटले आहे की ही सर्व अग्नीचीच रूपे होत, कुमार हाच रुद्रपुत्र-देवसेनानी कार्तिकस्वामी म्हणून पुराणात वर्णिला आहे.

"शतपथ ब्राह्मण" पानाकडे परत चला.