चर्चा:विरामचिन्हे
ह्या लेखातला फडके-अत्रे संवाद अत्रेंची "हुशारी" (आणि फडकेंचे अतिबुद्धिमांद्य) दाखवणारा आणि "गमतीचा" भासला तरी तो उघडपणे कोणीतरी ओढूनताणून निव्वळ काल्पनिकपणे रचलेला आहे. तो संवाद विकिपीडिआत उद्धृत करण्यापूर्वी खरोखरच घडला असल्याची पूर्ण खात्री प्रथम करून घेणे इष्ट दिसते. एरवी तो उदाहरणादाखल का होईना उद्धृत करणे हे फडकेंचा उगीचच खूप अपमान करणारे दिसते.
ज्या फडकेंनी "प्रतिभासाधन" हा मराठी भाषेसंबंधी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला होता त्यांना स्वल्पविरामाच्या उपयोगाबद्दल अज्ञान असावे, अत्रे आणि फडके ह्यांच्यात परस्परांसंबंधी मित्रत्वाची भावना अजिबात नव्हती तरीही फडकेंनी अत्रेंकडे स्वल्पविरामाच्या उपयोगाबद्दल पृच्छा करावी, आपली हुशारी फडकेंना दाखवण्याकरता अत्रेंनी फडकेंच्या पत्नींकडे सिनेमासंबंधात "तसले" वक्तव्य करावे, फडकेंच्या पत्नींनी ते वक्तव्य बावळटासारखे ऐकून घेऊन मग फडकेंना एखाद्या "बातमीदारासारखे" सांगावे, आणि फडकेंनी अत्रेंना त्या विधानाबद्दल बावळटपणे विचारावे, ह्या पाच गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीची शक्यता किती आहे? आणि तो सगळा संवाद समजा झाला असला, तर जगाला सांगितला कोणी? फडकेंनी? त्याच्या पत्नींनी? अत्रेंनी?.--Cgj 17:59, 11 मार्च 2006 (UTC)
ऊदाहरणाच्या आधी हे सुचवण्यासाठी सूचना समाविष्ट केली. ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
विषयांतर: फडकेंच्या स्वल्पविरामाविषयीच्या पृच्छेचे कारण त्यांचे अज्ञान नसून, त्यांना त्याविषयी अत्रेंना काय वाटते हे जाणून घेणेही असू शकते.
असो ... सूचनेमध्ये बदल आवश्यक असल्यास जरूर करावा.
-- परीक्षित 20:46, 11 मार्च 2006 (UTC)
फडकेंचा (आणि त्यांच्या पत्नींचाही) उगीचच अपमान करणारी आणि अत्रेंनी न दाखवलेली "हुशारी" त्यांना चिकटवणारी आख्यायिका उदाहरणादाखल का होईना, अनुचित भासते. शिवाय आख्यायिकेतला कोणीतरी ओढूनताणून रचलेला विनोदही फार उच्च दर्जाचा --म्हणजे फार "हुशारीचा" --नसून जरा असंस्कृतही भासतो. तेव्हा समजा "अत्रे" आणि "फडके" ह्या नावांऐवजी "गुंडोपंत" आणि "धोंडोपंत" अशी काल्पनिक नावे अधिक उचितपणे वापरली तरी त्या विशिष्ट विनोदातली काहीशी असंस्कृतता उरतेच असे दिसते. दुसरी कुठलीतरी उच्च विनोदी उदाहरणे मराठी वाङ्मयात असणारच.--Cgj 23:14, 11 मार्च 2006 (UTC)
ईतर चिन्हे
संपादननमस्कार, अजून एक चिन्ह बद्दल आपण माहिती दिली तर बरं होईल, ते म्हणजे डबल बार [Double bar(||)]. मराठी मधे ह्याला काय म्हणतात मला पण माहिती नाही. सहसा शोल्क मध्ये वापरणात येतं. कृपया ह्या मजकूर मधे ह्या बद्दल महिती द्या, ही विनंती. धन्यवाद. 180.151.135.216 १३:३२, ११ एप्रिल २०२१ (IST)