कांदे गाव:

        सांगली जिह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील हे गाव आहे.तालुक्यापासून 10किमी अंतरावर दक्षिणेकडे वारणा नदीच्या काठावर वसलेले आहे.गावात जोतिबा चे मुख्य मंदिर असून ते ग्रामदेवता आहे.दरवर्षी गुढीपाडवा झाल्यावर येणाऱ्या ७ व्या दिवशी यात्रा भरते.2-3 दिवस यात्रा भरते.गावात 2 जिह्या परिषद शाळा असून 1 हायस्कूल आहे.गावात ग्रामपंचायत 1952 ला स्थापन झाली असून सध्या 11 सदस्य गावाचा कारभार पाहतात. गावाला 2 तळे आहेत ज्याचा उपयोग पाण्यासाठी केला जातो.गावाला वारणा नदी 2किमी लाभली आहे त्यामुळे गावाची शेती बारमाही झाली आहे.बाराही महिने पाणी उपलब्ध असल्याने येथिल शेतकरी वर्षाला 2-3आंतरपिके घेऊन आपले उत्त्पन्न वाढवत आहेत. येथील प्रमुख पीक ऊस ,भात, मका,सोयाबीन,गहू आहे.याच्याजोडीला हरभरा,पावटा, मूग,वांगी,दोडका,इत्यादी प्रकारची फळभाज्या घेतात.पाणी उपलब्ध असल्याने दुभती जनावरे सुद्धा मोठया प्रमाणात आहेत .येथील दूध वारणा दूध,सुनंदा दूध,या दूध संस्था ना पाठवले जाते.गावापासून 3किमी अंतरावर विश्वास नाईक सहकारी कारखाना,18 किमी अंतरावर वारणा कार खाना असल्याने गावातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.गावाच्या शेजारी नदी ओलांडली की कोल्हापूर जिल्हा च्या हद्द सुरू होते.त्यामुळे सांगली कोल्हापूर उलाढाल वाढली आहे. त्यामुळे सर्व सोईनी युक्त असलेल्या या गावास प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी.
"वारणा नदी" पानाकडे परत चला.