चर्चा:वायुधारित वीजनिर्मिती प्रकल्प
वायुधारित म्हणजे काय ?
संपादनशीर्षकात असलेला 'वायुधारित' शब्द कोणत्या अर्थी योजला आहे, व त्याची व्युत्पत्ती/ शब्दयोजनेमागील तर्क कळला नाही. 'वायूवर आधारित' असा अर्थ सुचवायचा असल्यास 'वाय्वाधारित' असा समासयुक्त शब्द होईल असे वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १५ मार्च २०११ (UTC)
कदाचित होणार नाही
संपादनवायु+आधारित=वाय्वाधारित असेच व्हायला पाहिजे असे नाही. संस्कृतमध्ये काही अपवादात्मक संधिरूपे होतात.
उदा० विष्णो+इति=विष्ण इति; गो+अग्रम्=गोग्रम्; श्रियै+उद्यतः=श्रिया उद्यतः; गुरौ+उत्कः=गुरा उत्कः.या संधींच्या अनुकरणाने वायु+आधारित=वाया आधारित=वायाधारित किंवा गोग्रम्प्रमाणे वायुधारित.
मराठीत एक पररूपसंधी नावाचा प्रकार आहे. त्यात पहिल्या शब्दातला अंत्य स्वर लोप पावून दुसर्या शब्दातला स्वर शिल्लक राहतो. उदा० चकचक+ईत=चकचकीत; खर्च+ईक=खर्चीक; डांबर+ईकरण=डांबरीकरण, वगैरे. संस्कृतमध्येही कुलीन, लौकिक, शालेय, अशी रूपे होतात.
वायुधारित हे रूप योग्य आहे की नाही ते माहीत नाही, पण पूर्वरूपसंधी असा प्रकार कल्पून योग्य ठरवायला हरकत नसावी.---J १९:१८, १५ मार्च २०११ (UTC)
वायू आधारीत वीजनिर्मिती प्रकल्प
संपादनवायू आधारीत वीजनिर्मिती प्रकल्प असे पान बनवून त्याकडे हे निर्देशित केले पाहिजे असे वाटते. कारण वायूधारित हे योग्य नसावे - त्याचा अर्थ वायू धारण केलेला असा होतो जो काहीसा बरोबरही आहे. परंतु येथे वायू धारण न करता त्याच्या प्रक्रियेवर आधारित निर्मिती आहे म्हणून वायू आधारीत असा शब्द प्रयोग योग्य असावा. शिवाय नैसर्गिक वायू हा शब्दप्रयोग आधीच वापरात आहे म्हणून नैसर्गिक वायू आधारीत वीजनिर्मिती प्रकल्प असे पान बनवून त्याकडे हे निर्देशित करावे असे मत मांडतो.