चर्चा:वाढदिवस
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by J
जयंती आणि वाढदिवस या दोन्ही शब्दांचे अर्थ आणि उपयोग सारखे नाहीत. कारण,
- वाढदिवस हा जिवंत माणसाचा असतो, आणि त्यासाठी त्या माणसाचे समाजातले स्थान विचारात घेण्याचे कारण नसते. वाढदिवस हा बहुधा तारखेने पण काही घरांत तिथीने पाळला जातो. मेल्यानंतर पाळतात तो श्राद्धदिन, वाढदिवस नाही.
- जयंती ही ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तीच्या किंवा दिवंगत झालेल्या लोकप्रिय व्यक्तीची असते. आधुनिक काळात ती तारखेने पाळली जाते. परंतु जुन्या ऐतिहासिक काळातील आणि पौराणिक काळातील व्यक्तींच्या आणि देव-देवतांच्या जन्मतिथीलाच त्यांची जयंती पाळली जाते. शिवाजीची जयंती म्हणून काहीजण तिथीने पाळतात.
- जयंती ही संस्थेचीसुद्धा असू शकते. संस्थेची स्थापना ज्या तारखेला किंवा तिथीला झाली असेल, त्याच महिन्यातील त्याच तारखेला/तिथीला ती नंतरच्या वर्षात पाळली जाते. या जयंतीला वर्धापन दिवस असेही म्हणतात. संस्थेच्या २५व्या जयंतीला रौप्य जयंती, ५०व्या जयंतीला सुवर्ण जयंती वगैरे नावे आहेत. जयंती एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा नदीचीही असते. ’नर्मदा जयंती’ दरवर्षी माघ शुक्ल सप्तमीला असते. असल्या जयंतीला वर्धापन दिवस म्हणत नाहीत.
जयंती आणि वाढदिवस एक नाहीत. त्यानुळे जयंती या लेखाचे नाव बदलून वाढदिवस असे करणे निखालस चूक होते. शक्य असेल तर जाणत्याने ही चूक निस्तरावी.....J (चर्चा) २३:४१, ५ एप्रिल २०१३ (IST)