चर्चा:लुगडे
या लेखाचे पुनर्निर्देशन साडी कडे करणे बरोबर वाटत नाही.लुगडे हे सहसा ९ वार(३फूट=१वार -लांबी मोजण्याचे एक जुने परिमाण)असते तर साडी ही सहसा ५ अथवा ६ वार असते. त्याची नेसण्याची पद्धतही वेगवेगळी असते.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:४९, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
साडी, सारी, पातळ, आणि लुगडे हे समानार्थी शब्द असावेत. पाच किंवा सहा वारी लुगड्याला गोल साडी किंवा गोल लुगडे म्हणतात. सहा ते सात वारीला दंडिया. दहावारीला काय म्हणतात हे तामिळी माणसाला विचारावे लागेल. दक्षिणेकडे दोन तुकड्यांची साडीदेखील असते, तिला तामिळी पावडा म्हणतात .साड्या पन्नासाहून अधिक पद्धतीने नेसल्या जातात, शिकण्याचे खास वर्ग असतात....J १६:०५, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
लुगडे हा बहुतकरून महाराष्ट्रीयन पेहराव आहे.लुगडे 'एखादेवेळेस' साडी म्हणून नेसता येऊ शकेल पण साडी लुगडे म्हणून नाही. लुगडे नेसण्याची पद्धत ही धोतरासारखी असते तर गोलसाडी नेसण्याची पद्धत लुंगीसारखी.त्या त्या ठिकाणच्या वातावरणास अनुसरुन ही पद्धत वापरण्यात येते.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:१२, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
नऊवारी लुगडी ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये सररास नेसली जातात. भरूच व त्याच्या आसपास येणार्या एका दोन जिल्ह्यांतल्या गुजराथी बायकाही कासोट्याच्या साड्या नेसतात. साडीची लांबी नऊवारीपेक्षा कमी असावी. म्हणजे बहुधा पाच-सहा वारी साडी लुगड्याच्या पद्धतीनेच नेसली जाते. पुण्यातल्या एस पी कॉलेजच्या मुली पी टी साठी पाचवारी साड्या नऊवारी पद्धतीने नेसायच्या, अजूनही असतील. आणि विशेष गंमत म्हणजे गुजराथी भाषेत पुरुषाच्या कपड्यांनाही लुगडा म्हणतात. तर तमिळ माणसे लुंगीला धोती(म्हणजे धोतर) किंवा वेष्टी(म्हणजे नेसण) म्हणतात.
सारी ड्रेपिंग क्लासेस म्हणून गूगलशोध घेतला. दिल्लीची एक संस्था साडी नेसण्याचे १२५ प्रकार शिकवण्याचा दावा करते. त्यामुळे लुगडे हा केवळ मराठी पेहराव आहे हे पटण्यासारखे नाही....J १७:१९, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)
शायना एन्सी
संपादनशायना एन.सी. नावाच्या बाई पाचवारी साडी नेसण्याचे ५५ प्रकार शिकवतात. त्या ड्रेपिंग क्वीन म्हणून ओळखल्या जातात. ...J (चर्चा) १४:३३, १३ सप्टेंबर २०१२ (IST)
२८ मार्च २०१२ रोजी नाशिक येथे एका कार्यशाळेत, साडी डे्पिंगमधील तज्ज्ञ नूतन मेस्त्री यांनी उपस्थित महिलांना महाराणी, कुर्गी, टर्की, सासर-माहेर, वर्सोवा, जपानी, नऊवारी, सहावारी या साड्या कशा नेसायच्या हे प्रात्यक्षिकांसह शिकवले होते. साडी केवळ नेसायची कशी हेच नाही, तर प्रत्येक साडी विशिष्ट स्टाइलमध्ये कशी नेसायची याचीही माहिती यावेळी दिली गेली. तसेच खादीपासून ते कांजीवरमपर्यंत विविध प्रकारच्या साड्या नेसताना कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये केले गेले. असेच एक वर्कशॉप महाराष्ट्र टाइम्सतर्फे २४ जानेवारी २०१२ला आयोजित केले गेले होते. ...J (चर्चा) १५:१४, १३ सप्टेंबर २०१२ (IST)