चर्चा:लता मंगेशकर
या लेखातील सर्व लाल दुवे निघाले. अल्पमती ११:३६, १ ऑक्टोबर २००९ (UTC)
संदर्भ हवे
संपादनहा लेख वाचकपसंती असलेला आहे. अधिक विश्वसनीय करण्यासाठी संदर्भ देवूया.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१६, १९ मार्च २०१८ (IST)
अनामिक सदस्यांद्वारे लेखाचे विद्रूपीकरण
संपादनआज सकाळी लतादिदींचे निधन झाले. साहजिकच आज सगळीकडेच त्यांची चर्चा आहे. विकिपीडियावर त्यांचा लेख वाचायला येणाऱ्या लोकांची संख्याही फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मागच्या महिन्यातही ६,४००+ वेळा लेख वाचला गेला आहे.
परंतु काही अनामिक सदस्य लेखात त्यांना वाटेल ते, वाटेल तसे बदल करत आहेत. इतर माध्यमांतून "कॉपी पेस्ट" करून कुठेही कसाही मजकूर जोडला जात आहे. सकाळीही एका सदस्याने बऱ्याच ठिकाणी बोल्ड अक्षरांचा जागोजागी वापर केलेला आहे
लेखाचे महत्त्व आणि लोकप्रियता पाहता ताबडतोब या मुद्द्यावर लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद
--अमर राऊत (चर्चा) १८:१४, ६ फेब्रुवारी २०२२ (IST)
हे सहाजिक आहे. विकिपीडियावर अशी ठराविक दिवशी ठराविक लेखावर गर्दी होतेच. एक दोन दिवसांनी आपण ती दुरुस्त करू शकतो. जर फार विद्रुपीकरण झाले तर पान सुरक्षित करता येईल.- संतोष गोरे ( 💬 ) २०:३३, ६ फेब्रुवारी २०२२ (IST)
हो सर. धन्यवाद. --अमर राऊत (चर्चा) २१:४५, ६ फेब्रुवारी २०२२ (IST)