ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे अशा ठिकाणी हा प्राणी वास्तव्य करतो. रानडुक्कर हा पाण्याचा ज्या ठिकाणी निचरा असतो अशाच ठिकाणी मुख्यत्वेकरून राहणीमान पसंत करतो. या प्राण्याची चामडी जाड असते त्यामुळे त्याच्या शरीराला विशिष्ट प्रकारचा वास असतो. रानातील कंदमुळे झाडपाला आणि काही वेळेस मेलेली जनावरे हे त्याचे मुख्य खाद्द्य. डोंगराळ भागात आडोशाला एखाद्या झुडपात आपल्या अणकुचीदार सुळ्याने आणि पायाने माती खोदून त्यात बसून राहतो.

अलीकडे या प्राण्याची शिकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या प्राण्याची शिकार केवळ मांस साठी केली जाते. शेत कापणीला आले की ग्रामीण भागात शेतकरी सतर्क राहून शेतीचे नुकसान या प्राण्यापासून कमी कसे करता येईल याकडे लक्ष देतात. हा प्राणी मुद्दाम शेतीत घुसत नाही तर जंगले नष्ट झाले आहेत म्हणून अन्नासाठी शेतात येतो. कोकण भागात रानडुक्कर मोठ्या प्रमाणावर शेतीची नासधूस करतात.


या प्राण्याची शिकार ही प्रामुख्याने बंदुक, बॉम्ब गोळे आणि इलेक्ट्रिक शॉक आणि फास लावून केली जाते. कायद्यनुसार हा एक गुन्हा असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिकार होते.

आता या प्राण्याची संख्या कमी झाली आहे आणि काही वर्षांनी हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असेल. हा प्राणी पर्यावरण स्वच्छ करण्यास मदत करतो. मेलेली जनावरे खाऊन पर्यावरणातील दुर्गंधी कमी करतो, पण दुर्भाग्य हेच की त्याचीच शिकार होते.

"रानडुक्कर" पानाकडे परत चला.