चर्चा:राजू शेट्टी
संभाव्य विषयांतर झाकले आहे. | |
---|---|
मजकूर | विकिपीडिया कक्षा बाह्य मजकुर विषयांतर साचाने झाकला................................... ................
श्री ज्योतिर्लिंग गिरजवडे ग्रामविकास मंडळ, मुंबई. आम्ही मुंबईचे गिरजवडेकर______________________ता. शिराळा, जि. सांगली ………………………………..……......…………………………………… द्वारा: श्री. डी. आर. मुळीक. सी / १०४ एसके कॉम्प्लेक्स (गोविंद धाम) सह्याद्री बस स्टॉप समोर, कळवा, ठाणे. पिन – ४००६०५ (संपर्क फ़ोन: ९८६९१३२०८८, ९८६९६२०५०६, ९८६९२७१४१०) email: dhondiram.mulik@gmail.com …
दिनांक: 29 /05 /2013 प्रति, मा. खा. श्री राजू शेट्टी खासदार हातकणगले लोकसभा मतदारसंघ विषयः गिरजवडे गावाच्या पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवणाबाबत. महोदय, देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे होत आहेत परंतु आमच्या गिरजवडे, ता. शिराळा, जि. सांगली, या श्री जोतिबा देवाचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी माणसांना व जनावरांना दाहीदिशा भटकावे लागते. इथल्या शेतजमिनीपैकी एक गुंठाही जमीन पाण्याखाली नाही. निसर्गाच्या मर्जीनुसार पडणार्या पावसावरच इथल्या शेतकर्याना अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात गावाचा सर्व परिसर ओसाड पडलेला असतो. पिण्याच्या पाण्याच्या काही योजना राबवण्याचा प्रयत्न झाला पण फारस्या त्या यशस्वी झालेल्या नाहीत. २० वर्षांपूर्वी गावाच्या पूर्वेस मोंडेवाडीनजीक गायमुख ओढ्याच्या संगमावर मध्यम पाटबंधारा (M. I. TANK) होण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे खात्याने १९९२ साली त्या जागेचा सर्वे करून भूगर्भाची तपासणी करण्यासाठी बोअरवेल मारल्या. त्यानंतर ते काम ठप्पच आहे. संबंधित खात्याकडूनही काहीच कळले नाही. राजकीय नेत्यांकडून मात्र ‘धरण मंजूर झाले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे,' अशी आश्वासने जवळजवळ वीस वर्षांपासून मिळत आहेत. गाव फक्त शासनाच्या व नेत्यांच्या आश्वासनावर पाण्याअभावी जगत आहे. याचप्रमाणे गावाच्या गायमुख ओढ्यावर१९७२ सालच्या दुष्काळावेळी रोजगारहमी योजनेतून पाझरतलावाचे काम सुरू झाले होते. त्यावेळी दोन्ही गडग्यांच्या बाजूने मातीच्या बंधार्याचे काम जवळजवळ २५-३०% झाले. परंतु तेही गेली ४० वर्षे तसेच पडून आहे. त्याचप्रमाणे शेळके दर्यातील पाझर तलावाचे कामही झालेले नाही. गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रगतीत बर्याच घटना घडल्या. शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील चांदोली धरणाचे पाणी वाकुर्डे योजनेद्वारे कराड तालुक्यातील येणपे येथे बोगद्याद्वारे सोडून मांड नदीद्वारे कृष्णा नदीला मिळाले. देशातील पहिला नदीजोड प्रकल्प झाला असे म्हणण्यात काही वावगे होणार नाही. परंतु ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे, तेथे कोणतीही योजना पूर्ण होत नाही. गिरजवडेच्या सभोवतालच्या गावांत एकतरी पाझरतलाव झाला आहे. शेजारच्या सातारा जिल्ह्यातील जिंती व येणपे गावात ठिकठिकाणी तलाव बांधून तो भाग सुपीक केला आहे. याच ठिकाणी वरीलप्रमाणे वाकुर्डे योजनेद्वारे शासनाने चांदोली धरणाचे पाणी बोगद्याद्वारे नेलेले आहे. पण शिराळा तालुक्यातील उत्तर भागात पाण्याची अत्यंत टंचाई असूनही कोणतीही ठोस योजना अद्याप राबवण्यात आलेली नाही. विशेषता त्यामध्ये गिरजवडे गावाच्या पाण्याचा प्रश्नही फारच बिकट झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या गाव डोंगरभागात उंचावर असल्यामुळे त्याची तीव्रता फारच जाणवत आहे. यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे ठोस नियोजन होत नाही. तरी सबब आमच्या गावाच्या पाणीप्रश्नाबाबत व्यक्तिशः लक्ष घालून संबंधित अर्जाबाबत चौकशी करून आम्हाला खुलासेवार कळवावे व उपरोक्त गायमुख व शेळके दर्यातील पाझर तलावाचे काम सुरू करण्याबाबत योग्य कारवाई करावी, ही विनंती.
श्री ज्योतिर्लिंग गिरजवडे ग्रामविकास मंडळ मुंबई व गिरजवडे ग्रामस्थांच्या वतीने
पदसिद्द अध्यक्ष अध्यक्ष, सरचिटणीस, श्री मधुकर अर्जुन पाटील श्री धोंडीराम रामचंद्र मुळिक श्री यशवंत बळी शेळके
माहिती व योग्य त्या कारवाईसाठी या अर्जाच्या प्रति रवाना - मा. ना. श्री. पृथ्वीराज चव्हाण - मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. शिवाजीराव देशमुख - सभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा. ना. श्री. पतंगराव कदम - पालकमंत्री सांगली जिल्हा मा. खा. श्री राजू शेट्टी खासदार हातकणगले लोकसभा मतदारसंघ मा. श्री. शिवाजीराव नाईक - माजी राज्यमंत्री मा. श्री. मानसिंगराव नाईक - आमदार शिराळा मतदारसंघ मा. श्री. रणधीर नाईक - जिल्हा परिषद सदस्य सांगली मा. श्री. सत्यजित देशमुख - माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली मा. श्री जिल्हाधिकारी साहेब सांगली, मा. श्री तहसीलदार साहेब, शिराळा |
करणारा सदस्य/आयपी पत्ता | [[सदस्य:]] [[सदस्य चर्चा:|चर्चा]], योगदान |
ही नोंद [[सदस्य:]] या सदस्याने केली आहे. |
Start a discussion about राजू शेट्टी
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve राजू शेट्टी.