चर्चा:युनायटेड किंग्डम

Add topic
Active discussions

हा complex विषय आहे.संपादन करा

इंग्रजी विकिपीडिया वर काही संदर्भ असे:

पाटीलकेदार 13:43, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

मला काही फारसं समजलं नाही व मी पूर्ण लेख वाचला नाही परंतु वाचकांच्या सोयीसाठी आपण एक वेन-डायग्राम येथे उद्धृत करुयात. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करून लेखात योग्य ते बदल करावेत.धन्यवाद. महाराष्ट्र एक्सप्रेस 13:52, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
खरं तर जाणकारांची तेवढी गरज नाही. भाषांतरकार हवेत. इंग्रजी विकिपीडिया वरचे लेख आणि संबंधित आकृत्या/चित्रे उत्कृष्ट आहेत. पाटीलकेदार 14:04, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
मी एक संचिका भाषांतरीत करून लेखात समाविष्ट केली आहे. प्रस्तुत इंग्रजी लेख चांगला असला तरी इंग्रजी विकीत सर्वच आलबेल नाहीये!

आयसल्स -> आयल्ससंपादन करा

Island हे आयलंड असे उच्चारले (आणि लिहिले) जाते तसेच Isles हे आइल्स (किंवा आयल्स) असे उच्चारले (आणि लिहिले) पाहिजे. पाटीलकेदार 20:36, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

माझ्या मते आपण Ireland चा उच्चार आयर्लंड असा करतो.चूक भुल द्यावी घ्यावी.महाराष्ट्र एक्सप्रेस 06:17, 1 डिसेंबर 2006 (UTC)
मी "ब्रिटीश आयल्स" बद्दल बोलत होतो. आयलंड (Island) हे उदाहरण म्हणून दिले. आयर्लंड (Ireland) च्या उच्चाराबद्दल वाद नाही. पाटीलकेदार 07:57, 1 डिसेंबर 2006 (UTC)

उ: British Isles व 'complex विषय' संबंधित चर्चासंपादन करा

केदार, महाराष्ट्र एक्सप्रेस,

१. 'complex विषय' संबंधी:

केदार यांनी दिलेल्या 'United Kingdom (disambiguation)' पानावर 'युनायटेड किंग्डम' या नावाने इंग्लिशमध्ये ज्ञात असलेल्या सर्व शीर्षकांच्या नोंदी दिल्या आहेत. सध्या 'युनायटेड किंग्डम'(UK) चा अर्थ 'ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र' अशा अर्थी घेतला जातो. परंतु त्याखेरीज यापूर्वी खुद्द ब्रिटिश बेटांच्या इतिहासात त्यांच्या स्वतःच्या राजतंत्रातील भौगोलिक बदलांमुळे नावातही बदल झाले आहेत. सुरुवातीचे UK फक्त इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड यांचे होते; नंतर त्यात संपूर्ण आयर्लंडचा समावेश झाला. पुढे आयर्लंडचा बहुतांश भूभाग UKपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. या सर्व 'युनायटेड किंग्डम्स' करता तिथे दुवे दिले आहेत. इअतरही 'संयुक्त राजतंत्रांकरता' (जसे पूर्वीचे डेन्मार्क-नॉर्वे चे युनायटेड किंग्डम, नॉर्वे-स्वीडनचे युनायटेड किंग्डम, पोर्तुगाल-ब्राझिलचे ब्राझिल स्वतंत्र होईपर्यंतचे युनायटेड किंग्डम अशा शीर्षकांकरतादेखील) दुवे आहेत.

त्यामुळे ते पान खरे तर चंगल्या पद्धतीने निःसंदिग्ध केले आहे. मराठी विकिपीडियावर अशी गरज असेल तर आपले पानही असेच निसंदिग्ध बनवावे.

बाकी, या लेखात दिलेली 'व्हेन आकृती' या लेखाऐवजी 'ब्रिटिश बेटे' या विषयावरील लेखाकरता जास्त उपयुक्त आहे असे माझे प्रांजळ मत आहे. आणि केदार म्हणतात तसा इंग्लिश विकिपीडियावरील लेख उत्तम आहेच; त्यावरून संदर्भ घेऊन मराठीत तो लेख आणणे बरे पडेल.


२. महाराष्ट्र एक्सप्रेस,

केदार Ireland बद्दल बोलत नव्हते, तर British Isles या शब्दातल्या Isles शब्दाबद्दल बोलत होते. Isles चा उच्चार 'आयल्स' असा होतो असे त्यांचे म्हणणे आहे, जे बरोबर आहे.

केदार,

British Isles करता मराठीत 'ब्रिटिश बेटे' असा शब्द अगोदरपासून आहे. माझ्या वाचनात हा शब्द बर्‍याच प्रमाणात वापरला गेल्याचे मला स्मरते. त्यामुळे 'ब्रिटिश आयल्स/ आइल्स' अशा लेखनाऐवजी 'ब्रिटिश बेटे' असा शब्द वापरणे बरे.

खरं सांगायच तर मला या विषयावर जास्त खोलात जायचं नाहीये. इंग्रजी विकीचा लेख नि:संशय उत्तम आहे परंतु माझ्या मते मी महाराष्ट्र व त्यासंबंधीचे लेख वाढवेन.युके इतकं महत्वाचे नाहीये. तरी सध्याच्या (लेखाच्या) स्थितीत मी आपण सुचविलेले बदल करेन पण मला या विषयात फारसं माहित नाही व मी तो इंग्रजी लेख जास्त खोलात वाचलाही नाहीये.धन्यवाद,महाराष्ट्र एक्सप्रेस 07:56, 1 डिसेंबर 2006 (UTC)
ठीक आहे! वेळ मिळाला तर मी संपादित करेन. इंग्रजी विकिपीडियाचे संदर्भ या पानावर पोहोचलेल्या लोकांसाठी दिले, ज्यायोगे त्यांना या विषयाची क्लिष्टता कळेल. खरे तर एकदा मी स्वतः खूप गोंधळून गेलो होतो तेव्हा या लेखांमुळे मला बरेच काही स्पष्ट झाले. कदाचित जोपर्यंत लेख लिहिला जात नाही तोपर्यंत ते संदर्भ मुख्य पानावर ठेवता येतील. पाटीलकेदार 08:18, 1 डिसेंबर 2006 (UTC)
"ब्रिटीश बेटे" हे प्रामुख्याने वाचल्याचे मलाही आठवते. तेच ठेवावे. पाटीलकेदार 07:59, 1 डिसेंबर 2006 (UTC)
मी संबंधित बदल केले आहेत. महाराष्ट्र एक्सप्रेस 08:11, 1 डिसेंबर 2006 (UTC)
"युनायटेड किंग्डम" पानाकडे परत चला.