माणगाव गावाविषयी संपादन

या मजकुरात माणगाव ( जि. रायगड) येथे श्री. नातू यांनी कीर्तनसेवा केल्याचा उल्लेख आहे. वास्तविक श्री. नातू यांनी माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे कीर्तने केली आहेत. हे माणगाव थोर दत्तसंप्रदायी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे जन्मगाव आहे. त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर गावात आहे. त्यानंतर स्वामींनी नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) येथे घाट बांधला. तेथे स्वामींची मूर्ती असलेले मंदिर आहे. पदयात्रेने देशभ्रमंती करणाऱ्या स्वामींनी गुजरातमध्ये गरुडेश्वर येथे नर्मदाकिनारी समाधी घेतली. दत्तसंप्रदायात वासुदेवानंदांना मोठे स्थान आहे.

प्रमोद कोनकर (चर्चा) १४:४५, ८ डिसेंबर २०१६ (IST)Reply
"माणगाव" पानाकडे परत चला.