मनोरमा राईलकर यांच्या मृत्यूतारखेविषयी

संपादन

@J: माझ्याकडे आॅगस्ट २०१०मध्ये प्रकाशित झालेला एक संदर्भग्रंथ आहे. त्यात मनोरमाबाईंचा मृत्यू झाल्याचा उल्लेख वाचनात आला; अर्थात त्यात मृत्यूची तारीख किंवा साल याचा उल्लेख नाही पण सदर ग्रंथ आॅगस्ट २०१० मध्ये प्रकाशित असल्याने त्यापूर्वी कधीतरी मनोरमा राईलकरांचा मृत्यू झाला असावा.

या लेखात २०-२-२०१२ ही मृत्यूची तारीख दिसली.

तुमच्याकडे संदर्भ उपलब्ध असल्यास धुंडाळण्याची तसदी घेऊन आवश्यक वाटल्यास लेखात मृत्यूदिनांकाचा बदल करावा. संतोष दहिवळ (चर्चा) १२:३७, ३ मार्च २०१४ (IST) =---- मनोरमा राईलकर यांची जन्मतारीख आणि आणि त्यांचा मृत्युदिनांक नेमका कोठून घेतला होता, हे आता आठवत नाही. पण २३ जून २०१०सालच्या वर्तमानापत्रातून संदर्भ घेतल्यावर मिळालेली माहिती टाकून योग्य ती दुरुस्ती केली आहे.संशयकल्लोळची रोहिणी कालवश .....J (चर्चा) १३:४१, ३ मार्च २०१४ (IST)Reply

महाराष्ट्र टाइम्समधील ’त्या’ बातमीत ’बेबंदशाहीमध्ये चंदबाईची, नृत्यकथिकामध्ये यामिनीची’ असे शब्द आहेत. बेबंदशाहीमध्ये कुणी चंदबाई होती, असे आठवत नाही; आणि नृत्यकथिक असे नाटकही असल्याचे माहीत नाही. मृच्छकटिकात कोणी यामिनी होती? ’मानापमना’त भामिनी, पुण्यप्रभावात दामिनी, संशयकल्लोळात रोहिणी, विद्याहरणात देवयानी आणि ’लग्नाची बेडी’त यामिनी असल्याचे माहीत आहे. पण मृच्छकटिकात यामिनी असल्याचे आठवत नाही. जाणकाराने जरूर असल्यास दुरुस्ती.करावी....J (चर्चा) १३:५५, ३ मार्च २०१४ (IST)Reply


==त्याशिवाय== सातारा नगरपरिषदेच्या २०११ सालच्या निवडणुकीत मनोरमा अनंत राईलकर नावाच्या ७९ वर्षांच्या एक बाई उभ्या होत्या (उमेदवार क्रमांक 7884).त्या कोण असाव्यात? संदर्भ : उमेदवार यादी...J (चर्चा) १४:२८, ३ मार्च २०१४ (IST)Reply

"मनोरमा अनंत राईलकर" पानाकडे परत चला.