भारतीय वायू सेना" हे पान "भारतीय हवाईदल" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: मराठीतील रूढ शब्दप्रयो�

तुम्ही केलेले वायू सेना चे स्थानांतर हवाई दल मला बरोबर नाही वाटत

हवाई दल हा मुळता हिंदी शब्द आहे

सुभाष राऊत १८:२१, २८ डिसेंबर २००७ (UTC)

Re: Airforce संपादन

सुभाष, ’हवाई दल’ हा शब्दप्रयोग मराठी वृत्तपत्रीय आणि संरक्षणविषयक लिखाणात Airforce या शब्दाकरता बर्‍याच प्रमाणात आणि काळापूर्वीपासून वापरात असल्याने रूढ झालाय. बालपणी वाचायला लागल्यापासून ’सकाळ’, ’लोकसत्ता’, ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रांत ’भारतीय/अमेरिकन/पाकिस्तानी हवाई दल’, ’हवाईदलप्रमुख’, ’हवाई दलाची प्रात्यक्षिके’ यासारखे शब्दप्रयोग वापरात असल्याचे स्मरते (भाषिक पैलूंकरता वृत्तपत्रेच सर्वोत्तम संदर्भ असतात असे नाही हे मलाही मान्य आहे. हल्ली वृत्तपत्रांतही काही वेळा धेडगुजरी, व्याकरणदृष्ट्या चुकीचे, शुद्धलेखनात गंडलेले लिखाण वाचायला मिळते :D. पण शब्दप्रयोगाची रूढता दाखवण्याकरता मी त्यांचा संदर्भ देतोय.). त्यातील ’हवा’ या मुळातल्या फारसी शब्दाचे ’हवाई’ हे नामसाधित विशेषण हिंदी, मराठी अशा भारतीय भाषांत ’तत्सम शब्दांसारखे’ सामावले गेले आहे. ’वायुदल’ किंवा ’वायुसेना’ हे शब्द केंद्र सरकारी पातळीवरील संस्कृतप्रचुर हिंदीचा वापर करण्याच्या अलिखित धोरणातून निपजलेल्या परिभाषेतले शब्द आहेत. मराठीत रूढ शब्दप्रयोग नसताना सरकारी परिभाषेतल्या शब्दांची उसनवारी करायला हरकत नाही; पण मराठीत त्यापेक्षा वेगळे शब्दप्रयोग रूढ असताना सरकारी हिंदी शब्दप्रयोगांशी बांधिलकी मानायची गरज नाही (असे माझे मत आहे. :) ). बाकी, ’हवाई दल (यात ’हवाई’ हा शब्द विशेषण असल्याने ’दल’ या शब्दापासून वेगळा लिहिला जातो.)’ ’हवाईदलप्रमुख (हा शब्द सामासिक असल्याने सलग लिहिला जातो.)’ हे शब्द मराठी वृत्तपत्रांत वापरली गेल्याची उदाहरणे खालीलप्रमाणे:

  1. गूगल शोध - ’हवाई दलाने’
  2. गूगल शोध - ’हवाई दलाच्या’
  3. गूगल शोध - ’हवाई दलाचा’
  4. गूगल शोध - ’हवाई दलाची’
  5. गूगल शोध - ’हवाई दलास’
  6. गूगल शोध - ’हवाई दलातील’
  7. गूगल शोध - ’हवाई दलात’
  8. गूगल शोध - ’हवाईदलप्रमुख’

खेरीज, ’वायुदल’ ’वायुसेना’ हे शब्द पुनर्निर्देशित शीर्षकांमध्ये आपण वापरू शकतोच.

--संकल्प द्रविड ०६:२८, ३१ डिसेंबर २००७ (UTC)

"भारतीय हवाई दल" पानाकडे परत चला.