चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष
या लेखातील मूळ ऐतिहासिक स्वरूपाचा मजकूर गाळून त्या जागी व्यक्तींची स्तुती आणि निंदा नालस्ती करणारा मजकूर टाकण्यात आला आहे. या मजकुरापैकी खोटी भलावण करणारा आणि व्यक्तींची बदनामी करणारा मजकूर लवकरात लवकर काढून टाकावा. हे काम जितकया लवकार होईल तितके बरे.
मोठ्या कष्टाने संकलित केलेला आणि आता गाळून टाकलेला मजकूर
संपादनभारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा संपूर्ण इतिहासच फाटाफुटींनी भरलेला आहे. दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या प्रक्रियेचे वर्णन करता येईल.
पहिल्यांदा हा पक्ष फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हाही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले). त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे. आत्तापर्यंत या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. त्यांतल्या काही छकलांची नावे : -
- भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे
- यांपैकी १९ पक्षांची मान्यता आयकर विवरणपत्रे न भरल्याने रद्द झाली.(१६-१२-२०१६ रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राजकीय पक्षांना आयकरापासून मुक्ती देण्यात आली. मान्यता रद्द झालेले हे सर्व पक्ष आता मान्यताप्राप्त होतील!)
- आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
- आर.पी.आय.(आठवले)
- इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पँथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
- उत्तर प्रदेश रिपब्लिकन पार्टी (
- ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
- खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी डेमॉक्रॅटिक गट (खोरिप, उपेंद्र शेंडे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
- दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष (अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय अध्यक्ष)[१]
- दलित पँथर
- भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
- भारतीय युथ पँथर
- युवा दलित पँथर
- दलित सेना
- नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
- पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
- पॉलिटिशियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), उत्तर प्रदेश
- पीपल’स रिपब्लिकन पक्ष - जोगेंद्र कवाडे यांची पार्टी
- प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
- बहुजन भीम पँथर
- बहुजन महासंघ - मखराम पवार यांची पार्टी
- बहुजन रिपब्लिकन पार्टी
- बहुजन रिपब्लिकन युनायटेड - सुलेखा कुंभारे
- बहुजन समाज पार्टी (आंबेडकर-फुले)
- भारतीय युथ पँथर
- भीमशक्ती पार्टी
- भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
- भारतीय रिपब्लिकन पक्ष
- भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
- भीमशक्ती रिपब्लिकन सेना () : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
- महाराष्ट्र डावी लोकशाही समिती (मडालोस)
- युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे)
- यूथ रिपब्लिकन (मनोज संसारे)
- राजगृह रिपब्लिकन पार्टी
- रिपब्लिकन जनशक्ती पक्ष (पक्षप्रमुख अर्जुन डांगळे; पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष शैलेंद्र मोरे)
- रिपब्लिकन टायगर फोर्स
- रिपब्लिकन पँथर्स -
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राज घाडगे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) (अध्यक्ष - रामेश्वर सूर्यभान गवई)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक (टी.एम. कांबळे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे-आक्काताई बापूसाहेब कांबळे)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मोघा)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (तळवलकर)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजा ढाले)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आर्के. (आर्के म्हणजे राजाराम खरात)
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ई. - (ई म्हणजे एकतावादी)
- रिपब्लिकन लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ़्रंट (रिपब्लिकनांची डावी लोकशाही समिती - रिडालोस - RIDALOS) (इ.स. २०१४च्या निवडणुकांसाठी हिचे रूपांतर मडालोस (महाराष्ट्र डावी लोकशाही समिती) असे झाले आहे.)
- रिपब्लिकन संघर्ष दल (संस्थापक संजय भीमाले)
- रिपब्लिकन सेना (अध्यक्ष अनुज आनंदराज) { राज्यशाखेचे अध्यक्ष : महाराष्ट्र-काशीनाथ निकाळजी; कर्नाटक-जिगानी शंकर).
- वंचित बहुजन आघाडी (प्रकाश आंबेडकर)
- सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी (कार्ल मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानांवर आधारित पक्ष - स्थापनकर्ते कॉम्रेड शरद पाटील)
- हरियाणा रिपब्लिकन पार्टी
अन्य तत्सम पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष
संपादनलक्ष्मण माने (भटके विमुक्त संघटना), लक्ष्मण गायकवाड (भटके विमुक्त जाती जमाती संघटना), प्रा. मोतीराम राठोड (राष्ट्रीय बंजारा दल), बाळकृष्ण रेणके (भटके विमुक्त जमाती), एकनाथ आव्हाड (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना), प्रफुल्ल पाटील, रोहिदास समाज पंचायत संघ (अध्यक्ष भागुराम कदम), व्ही. जी. गायकवाड, रविंद्र बागडे, कत्रुलाल जैन, अविनाश कुट्टी, इ (मजकूर समाप्त)
हा मजकूर ऐतिहासिक स्वरूपाचा असल्याने पुनश्च लेखात टाकण्यास कुणाचीही हरकत नसावी.. ... ज (चर्चा) १९:४६, २१ ऑक्टोबर २०१७ (IST) _______ टीप: यात जी नावे आहेत ते निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले पक्ष आहेत/होते, गट नव्हते. त्यांतील बहुतेकांना स्वतंत्र चिन्हे आहेत/होती. ...ज (चर्चा) १९:४६, २१ ऑक्टोबर २०१७ (IST)
लेखाचे काम चालू असल्यामुळे मजकूर तात्पुरता येथे हलवण्यात आला आहे
संपादनसदर विभाग पुढीलप्रमाणे . लेखाची बांधणी झाल्यावर योग्य तेथे मजकूर संदर्भ जोडून डकवण्यात येईल. प्रसाद साळवे (चर्चा) २२:२५, २४ मार्च २०१८ (IST)
भारतीय रिपब्लिकन पक्षाची बदनामी
संपादनरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात भारतीय रिपब्लिकन पक्षाची कायम बदनामी करण्यात येत आहे. वरील यादी व वर्रील चर्चा मजकुरातून त्याचा प्रत्यय येतो. वर म्हटले आहे कि दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, याचा अर्थ ५० वर्षात ३६५*५० =१८२५० पेक्षा अधिक ????? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गट स्थापन झाले आहेत पण इतके नव्हे जितके सागितले जातात. उद्या महाराष्ट्रातील एखाद्या तालुक्यात काँग्रेस शब्द असलेल्या पक्षाची स्थापना झाल्यास तो काँग्रेस चा गट असेल काय ??? बर कॉंग्रेस पक्षापासून अलग होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तर तो मूळ कॉंग्रेस चा गट असेल कि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गट असेल ??? याच प्रकारे भाजपाचा उदय ज्या मूळ पक्षापासून झाला. तर भाजप हा गट पक्ष धरता येईल काय ? तसेच युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे) यांनी ठाण्याला स्थापन केला मुळात हा गटाचा उप उप गट होता परंतु त्याचा संबंध मूळ भारतीय रिपब्लिकन पक्षाचा गट म्हणून उल्लेख करणे व वरील यादीत त्याचा उल्लेख करणे म्हणजे मूळ भारतीय रिपब्लिकन पक्षाची बदनामी करणे होय. वरील यादीत हरियाणा रिपब्लिकन पार्टी चा समावेश होता. तसेच यादीतील सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी कार्ल मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानांवर आधारित पक्ष - स्थापनकर्ते कॉम्रेड शरद पाटील याचा मूळ रिपब्लिकन चा गट कसा होईल ??? यामुळे बदनामी हेतूला आणखीच पुष्टी मिळते. यावरून अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष हा भारतातील रिपब्लिकनचा गट आहे असा विनोद फिरवण्या सारखे आहे. म्हणूनच पुरेशी उल्लेखनीयता व संस्थापक त्याचा आधीचा गट स्थापन दिनांक राजकीय कार्य पार्श्वभूमी लक्षात घेऊन यादित्त पक्ष टाकावेत. केवळ यादी वाढवणे नव्हे. म्हणून वरील संपूर्ण यादी मूळ लेखात टाकण्याला माझा विरोध आहे. तसेच उल्लेखनीयता नसलेले व पुरेसे कार्य वा संदर्भ नसलेले रिपब्लिकन पक्षाचे रिकामे लेख तयार केले जाऊ नयेत. उदा. भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) अथवा वगळावेत. आणि लेखात वस्तुनिष्ठ भर घालून लेख विस्तारास मदत करावी परंतु बदनामी थांबवावी ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) ०९:२४, २५ मार्च २०१८ (IST)
ज यांनी धोरण लागु केल्यापासून तीसऱ्यांदा केलेला प्रताधिकार भंग
संपादन- स्त्रोताचा दुवा :http://samratlekh.blogspot.com/2016/05/blog-post_30.html
- स्त्रोताची तारिख व वेळ : Monday, 30 May 2016
- २१:३७, १७ जून २०१८ ची आवृत्ती ज (चर्चा | योगदान) करुन यांनी नकल-डकव करुन मजकूर जोडला हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे.
- त्यामुळे मजकूर @ज: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते.
- ज यांनी धोरण लागु केल्यानंतर शिवाय अनेकदा ताकिद देऊनही केलेला ही प्रताधिकार भंगाची तिसरी वेळ आहे. @Tiven2240 आणि अभय नातू: प्रचालकांनी ह्यावर योग्यती कारवाई करावी. WikiSuresh (चर्चा) ०३:५४, १८ जून २०१८ (IST)
[१] हा लेख माझ्या अन्यत्र लिहिलेल्या लेखाची काॅपी आहे. माझ्या लेखात पक्षांची नावे अकारविल्हे आहेत. अशी रचना कोणीही करत नाही. बहुतेकांना अ ते ज्ञ ही मुळाक्षरे क्रमाने सांगता येत नाहीत, हे शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे अनुभवसिद्ध विधान त्यांच्या एका पुस्तकात दिले आहे. ते जेव्हा शुद्धलेखनाचे वर्ग घेतात तेव्हा सुरुवातीला उपस्थितांकडून मुळाक्षर क्रमाची उजळणी करून घेतात. तेव्हा माझ्यावर प्रताधिकारभंगाचा आरोप करताना सावधानता बाळागावी. ...ज (चर्चा) १८:१४, १८ जून २०१८ (IST)
- @ज:
- तुम्ही हा लेख येथे आधी लिहिलात की ब्लॉगस्पॉटवर? जर येथे आधी लिहिला असेल तर हा मजकूर पुनर्स्थापित केला जावा. जर ब्लॉगस्पॉटवर आधी लिहिली असेल तर तो येथे आणताना प्रताधिकारभंग होत नाही याची खात्री द्यावी.
- @Tiven2240 आणि Sureshkhole:,
- वरील गोष्टीची शहानिशा करुन गरज लागल्यास मजकूर पुनर्स्थापित करावा.
- अभय नातू (चर्चा) २१:२०, १८ जून २०१८ (IST)
- ज ज्या स्वत:च्या लेखाविषयी बोलत असावेत तो मुळ लेख लोकप्रभा मध्ये आलेला हा लेख आहे, जो
२८ ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशित झाला आहे, त्यामुळे ज यांनी विकिवर त्याचीच नकल-डकव केली असावी. जी सुध्दा प्रताधिकार भंग आहेच.
- ते काहीही असले तरीही, असले फ़डके शुध्दलेखन वापरणारे पुणे-मुंबईमध्ये गल्लोगल्ली आहेत.
- शिवाय मजकूर कुठूनतरी उचलून आणून त्यावर असले संस्कर करुन नवे लेख म्हणून डकवणे हे काही ज नी पहिल्यांदा केलेले नाही.
- वर दिलेल्या अहवालात स्त्रोताची तारिख स्पष्ट दिलेली आहे, त्यामुळे जरी त्याच व्यक्तिने आपला जुना दुसरीकडे प्रकाशित केलेला लेख विकीवर आणला तरी तो, प्रताधिकार भंगातून सुटत नाही शेवटी प्रताधिकार लेखकाकडे नसून प्रकाशकाकडे(वर्तमानपत्रांबाबत) असतात हे लक्षात असूद्यावे.
- सबब, हा मजकूर काढून टाकावा, आणि समज कायम ठेऊन ज यांनी केलेल्या उत्पातांकडे गांभिर्याने पहावे. WikiSuresh (चर्चा) २२:१७, १८ जून २०१८ (IST)
कायमस्वरूपी वगळावा
संपादन@Tiven2240: सदस्य सुरेश खोले यांनी दर्शवलेला व सदस्य ज द्वारा डकवलेला भारतीय रिपब्लिकन पक्षाची शकले हा विभाग लेखातून कायमस्वरूपी हटवण्यासाठी प्रयत्न करावेत.कारण हा विभाग व त्यातील माहिती विनासंदर्भीत व राजकीय पक्षाची बदनामी करणारी आहे. सदर उपविभागाचा मजकूर चर्चा पानावर उपलब्ध आहे. त्यामुळे तेथून तो अनेकवेळा डकवलेला गेलेला आहे. म्हणून तो मजकूर तेथूनही हटवला जावा ही विनंती प्रसाद साळवे (चर्चा) ०४:२८, १८ जून २०१८ (IST)
- @अभय नातू: या संदर्भात आपली मदत लागेल. कृपया कॉपीराईट मजकूर सुद्धा काढा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:२७, १८ जून २०१८ (IST)
--- हा काॅपीराईट मजकूर नाही, ती मी जमा केलेली माहिती असून ते ऐतिहासिक सत्य आहे. त्या माहितीवर असलाच तर फक्त माझा अधिकार आहे. ती रिपब्लिकन पक्षाची बदनामी नाही. असेच लेख मी समाजवादी पक्षाबद्दल, काॅंग्रेसबद्दल आणि द्राविडी पक्षांबद्दल लिहिले आहेत.... ज (चर्चा) १८:२०, १८ जून २०१८ (IST)
- मी वर मांडलेल्या "रिपब्लिकन पक्षाची बदनामी मध्ये व्यक्त केलेल्या प्रत्येक प्रश्नाबाबत विस्ताराने लिहावे ही विनंती. सदर विभागातून एका पक्षाची बदनामी होते. यावर मी ठाम आहे.कृपया वादग्रस्त मजकूर लेखात टाकू नये हि विनंती प्रसाद साळवे (चर्चा) १८:५९, १८ जून २०१८ (IST)
- तुम्हाला बदनामी वाटणारा मजकूर सत्य आहे का? नसल्यास ती बदनामी असू शकते. नक्की आहे कि नाही यासाठी वकीलांचा सल्ला लागू शकतो.
- अभय नातू (चर्चा) २१:३३, १८ जून २०१८ (IST)
--- 'रिपब्लिकन पक्षाची शकले' हा भाग मी २८-१०-२०१३ रोजी किंवा त्यापूर्वी लिहिला आहे. ... ज (चर्चा) २१:५५, १८ जून २०१८ (IST)
भारतीय रिपब्लिकन पक्ष:वस्तुस्थिती व संदर्भ
संपादनसर्वपथम भारतीय रिपब्लिकन पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे निवडणूक आयोगाच्या यादीप्रमाणे दोन वेगवेगळे पक्ष आहेत.अधिकृत संकेतस्थळावरील ही यादी पहा. दोन्ही पक्ष नोंदलेले पण मान्यता नसलेले आहेत. क्र.428 - Bharatiya Republican Paksha आणि क्र.1674 - Republican Party of India. त्यामुळे लेखाचे पहिले वाक्यच चुकीचे आहे का? इतर मूळ संदर्भ तपासावे लागतील.
भारतीय रिपब्लिकन पक्ष हा स्थापनेपासूनच विभागत आला आहे हे वास्तव आहे , ऐक्याची प्रक्रिया सतत चालूच असते.त्याविषयी आलेला हा सविस्तर लेख पहा. यात सर्व गटाच्या नेत्यांची मते आहेत. तसेच या प्रबंधात सुरुवातीपासून फुटीचा आढावा घेतला आहे.या संदर्भासहित वस्तुस्थितीची मांडणी ही काही बदनामी नव्हे असे मला वाटते.
@ज: आपण कष्टाने संकलित केलेला मजकूर वरील अधिकृत यादीचा, बातमीचा आणि प्रबंधाचा संदर्भ देऊन पडताळून लेखात समाविष्ट करणे सहज शक्य आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:४७, २० जून २०१८ (IST)
- ^ www.nrporg.in