चर्चा:भारताचे सरन्यायाधीश

Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic नामभेद

नामभेद संपादन

@अभय नातू संविधानाच्या मराठी अनुवादामध्ये Chief Justice of India ला भारताचे मुख्य न्यायमूर्ती असे म्हटले आहे, पण इतर माध्यमामध्ये भारताचे सरन्यायाधीश किंवा भारताचे मुख्य न्यायाधीश हेच नाव वापरले आहे. त्यामुळे लेख कोणत्या नावाखाली ठेवला पाहिजे. Omega45 (चर्चा) ११:३४, १९ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

सरन्यायाधीश हे अधिक योग्य आहेल असे वाटते. हा शब्द सर्वोच्च पद दर्शवितो, उदा. सरचिटणीस, सरसेनापती. सैन्यात, विशेषतः प्रचंड मोठ्या सैन्यात अनेक सेनापती असू शकतात परंतु सरसेनापती एकच असतो.
अभय नातू (चर्चा) ००:३२, २० ऑगस्ट २०२२ (IST)Reply
"भारताचे सरन्यायाधीश" पानाकडे परत चला.