बृहद्त्रायी की बृहद्त्रयी संपादन

या ग्रंथाचे नाव बृहद्त्रयी असणे भाषेच्या दॄष्टीने अधिक योग्य असावे, असा माझा कयास आहे. संस्कृतात तीन वस्तूंच्या समूहास त्रयी म्हणतात (त्रायी नव्हे). त्यामुळे तीन मोठ्या ग्रंथांच्या या समूहाचे नाव बृहद्त्रयी असणे व्याकरणसंगत वाटते.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:३२, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

बृहद्त्रयी असेच बरोबर आहे. लिहिताना म्झ्याकडून चूक झाली आहे. --आभिजीत २१:०२, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

अष्टांगसंग्रह संपादन

अष्टांगसंग्रह आणि अष्टांगहृदयसंहिता हे वेगवेगळे ग्रंथ आहेत. त्यांतला पहिला वाहट ऊर्फ वृद्धवाग्भटाने(इ.स.६२५) लिहिला आणि दुसरा ग्रंथ, वाग्भट(इसवी सनाचे ६वे किंवा बहुधा ८वे शतक) याने लिहिला. चरक-सुश्रुत-वाग्भट यांचे ग्रंथ बृहद्त्रयी समजले जातात असे मला वाटते. असे असले तरी अष्टांगसंग्रह हा ग्रंथ कोणत्याही बाबतीत कमी नाही.

लघुत्रयींमध्ये शार्ङ्गधरसंहिता, भावप्रकाश आणि योगरत्नाकर हे ग्रंथ येतात. ...J २३:५३, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

अगदी बरोबर --आभिजीत १५:१४, १३ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply
"बृहद्त्रयी" पानाकडे परत चला.