संस्कृतमध्ये २२ उपसर्ग आहेत. अति, अधि, अनु, अप, अपि,(५) अभि, अव, आ, उद्, उप,(१०) दुर्‌, दुस्, नि, निर्, निस्,(१५) परा, परि, प्र, प्रति, वि,(२०) सम् आणि सु.(२२). ते खालील सूत्रात दिले आहेत.

'प्रपरापसमन्ववनिदुर्दुस् अभ्यधिसूद'ति 'निप्रतिपर्यपिउपआ'ङ्इति वि'सन्ति उपसर्गाः ||

सूत्रात दिल्याप्रमाणे प्रति हा स्वतंत्र उपसर्ग आहे, तो प्र+ती असा बनलेला नाही. .... (चर्चा) २१:५२, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply


@: प्रती आणि प्रति यात फरक आहे.--अभय होतू (चर्चा) २३:४१, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply


उपसर्गांमुळे धातूचे अर्थ बळजबरीने दुसरीकडे नेले जातात या अर्थाचे एक सूत्र :-

उपसर्गैण धात्वर्थो बलाद् अन्यत्र नीयते |
प्रहाराहारसंहारविहारपरिहारवत् ||

धातूंचे अर्थ उपसर्गामुळे बिघडतात, मूळ अर्थात सुधारणा होते, मूळ अर्थाला विशेषत्व येते, किंवा या तिन्ही गोष्टी होतात, या अर्थाचे एक सूत्र :-

धात्वर्थे बाधते कश्चित् कश्चित् अनुवर्तते |
तमेव विशिनष्ट्यन्य उपसर्गगतिस् त्रिधा ||

प्र उपसर्ग लागल्याने काय होते?/प्रचे अर्थ

संपादन

प्र = समोर, पुढे, दूर. (प्रचलन, प्रगमन)
प्र = अति (प्रगाढ, प्रमत्त)
प्र = आरंभ (प्रयाण)
प्र = आधिक्य (प्रवाद, प्रख्यात)
प्र = उत्पत्ती (प्रभव, प्रपौत्र-प्रौत्रापासून उत्पन्न झालेला- पणतू)
प्र = पूर्णत्व (प्रमुक्त-पूर्णपणे मुक्त)
प्र = वियोग (प्रोषिता-जिचा पती दूर गेला आहे अशी स्त्री)
प्र = उत्कर्ष (प्राचार्य-आचार्यांना बढती मिळाल्याने बनलेले)
प्र = मान (प्रणाम-मानाचा नमस्कार)

... (चर्चा) २३:०५, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply


@: आपण येथे अत्यंत उपयोगी माहिती लिहिलेली आहे. सदर लेख प्र या अक्षराबद्दल राहू द्यावा आणि आपण येथे नमूद केलेली उपयुक्त माहिती प्र(उपसर्ग) असे नवीन पान तयार करुन त्यावर द्यावी...आणि त्याचा दुवा या पानावर जोडावा, असे माझे मत आहे.

--अभय होतू (चर्चा) २३:३९, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply

"प्र" पानाकडे परत चला.