चर्चा:प्यारी-यारी (वेब मालिका)

मोठा मजकू

प्यारी-यारी वेबसीरीज

संपादन


प्यारी-यारी ही मराठी मधील गोष्ट रूपाने प्रदर्शित केली जाणारी पहिली हलकी-फुलकी वेबसीरीज असून ती नोव्हेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झाली आहे. अमेय रमेश परुळेकर यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले असून, याची गोष्ट हि अमेय रमेश परुळेकर आणि हर्षल आल्पे यांनी लिहिली आहे.युट्युब चॅनेल "आपला कट्टा" यावर हि वेबसरीज प्रदर्शीत करण्यात आली असून हे परुळेकर यांचे चॅनेल आहे. ह्या मालिकेचे प्रथम सत्र हे एकूण ८ भागांचे असून नंतर याचे दुसरे सत्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

प्यारी-यारी हि गोष्ट आहे एकाच घरात राहणाऱ्या ४ तरुण मीत्रांची आणि त्यांच्या एकमेकां मधल्या मस्त नात्याची. एक पत्रकार सुरेश बगळे , एक कवी देवदत्त , एक दिलफेक प्रेमिक राहुल आणि एक ऍक्टर रॉंनी असे हे चार जण व त्यांच्या शेजारी नुकतीच नव्याने राहावयास आलेली एक तरुण मुलगी प्रीशा यांच्या भोवती फिरणारी हि गोष्ट आहे.
शेजारी आलेल्या नायिकेच्या प्रेमात पडणाऱ्या या चार मुलांना जेव्हा हे कळते कि प्रीशा हि अगोदरच एका नात्यात असून त्याचे नाव भूषण आहे, हे कळल्या वर चौघांची होणारी घालमेल आणि त्यातच एका नवीन नायिकेने केलेला केलेला प्रवेश आणि त्यातूनच पुढील सत्रांत मालिके ने अचानक घेतलेलं वळण हे प्यारी-यारी मालिकेचं वैशिष्ट्य.

प्यारी-यारी हि मराठी मधील IMDb वर स्वीकारली गेलेली पहिली वेबसीरीज आहे प्यारी-यारी ला मराठी युवकांचा भरपूर पाठिंबा मिळून त्याचे एक लाखांहून अधिक प्रेक्षक आहेत महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने देखील या गोष्टीची दखल घेतली आहे.


== संदर्भ ==

https://www.mymovierack.com/show/pyaari-yaari-tv-mini-series-2016
http://www.imdb.com/title/tt6262534/?ref_=nm_knf_t1
https://www.youtube.com/channel/UCBBPSlV8O6DEUBUc8T6_jkA?view_as=subscriber
http://www.imdb.com/name/nm8595046/?ref_=tt_ov_st_sm
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=03112016101020

"प्यारी-यारी (वेब मालिका)" पानाकडे परत चला.