चर्चा:पौगंडावस्था

Add topic
Active discussions

किशोरवय (Adolescence) हा माणसाच्या वाढ व विकासाच्या प्रक्रियेतील एक कालखंड असून पौगंडावस्था (Puberty) हा त्यातील एक टप्पा आहे. त्यामुळे या लेखाचे नाव ’पौगंडावस्था’ या ऐवजी किशोरवय असावे का?

राजन १८:४९, १० जानेवारी २०१३ (IST)

या लेखाचे संपादन अजून सुरू आहे. मी त्यात भर घालतो आहे. त्यावेळी ’विपी’वरील लेखनासंबंधी सूचना मला येत आहेत व त्यांचे पालन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु या टप्प्यावरच हे वाचून कोणी त्याबद्दल सूचना केल्यास त्यांचा मला उपयोग होईल.

राजन १९:५४, ११ जानेवारी २०१३ (IST)

@Rajendra prabhune:,
तुम्ही हा लेखात शास्त्रीय माहितीची भर घातल्याबद्दल अनेक धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:३७, २२ मार्च २०१७ (IST)

धन्यवाद. संपादन अजून सुरू आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करावे ही विनंती.

राजन ०७:४५, २५ मार्च २०१७ (IST)

मराठी विकीपीडियावर पौगंडावस्था आणि किशोरवय हे दोन लेख आता जवळजवळ पूर्णावस्थेत आहेत. ते वाचून अभिप्राय द्यावा व सूचना द्याव्यात ही विनंती. तसेच इंग्रजीमधील ‘Adolescence’ या लेखाच्या मराठी लेखासाठी असलेल्या लिंकवरून “पौगंडावस्था” हा मराठी लेख येतो तिथे “किशोरवय” हा लेख आला पाहिजे व ‘Puberty’ या लेखाच्या मराठी लेखासाठी असलेल्या लिंकच्या पुढे कोणताच लेख नाही तिथे “पौगंडावस्था” हा लेख यायला हवा. तज्ज्ञ संपादकानी ही दुरुस्ती करावी किंवा दुरुस्ती कशी करावी याबद्दल मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

राजन ११:४०, ८ जून २०१७ (IST)

योग्य लिंक्स देणे साध्य झाले.

राजन २०:२८, ८ जून २०१७ (IST)

हा लेख उत्तमप्रकारे लिहिला गेला आहे व या सहसा वादग्रस्त असलेला विषय सुज्ञपणे हाताळला गेला आहे. लेखकांचे अभिनंदन.
लेखाची शैली विकिपीडिया/विश्वकोशीय आहे. यात काही बदल हवे असतील तर इतर संपादक ते करतील किंवा सुचवतीलच.
हा लेख मुखपृष्ठ सदर करावा असा प्रस्ताव मी मांडत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:४४, ८ जून २०१७ (IST)
@अभय नातू:

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. लेखन-संपादन योग्य पद्धतीने होत असल्याबद्दल आता मला विश्वास वाटेल व काम उत्साहाने चालू ठेवता येईल. धन्यवाद.

राजन १८:२४, ९ जून २०१७ (IST)

विकिपीडियाचे संदर्भ बद्दल एक विनंतीसंपादन करा

@Rajendra prabhune:

दोन्ही लेख उत्तमच झाले आहेत. बऱ्याचदा इंग्रजीतून वाचूनही माहित असूनही मराठीत वाचण्यात अधिक समाधान वाटते. किसोरावस्थेत प्रवेश करणाऱ्यांना तर नक्कीच हि माहिती उपयूक्त ठरावी.

आपण सूचना मागवल्या आहेत तेव्हा एक छोटी विनंती, आंतरजालावरील वेबसाईटचे (इंग्रजी विकिपीडिया) धरुन संदर्भ देताना सहसा आपण लिहितो तेव्हाच वेबसाईट पाहिलेली असते हे खरे असले तरी काही वेळेस तसे होत नाही आणि संदर्भ दिलेली वेबसाईट काळाच्या ओघात बऱ्याचदा बदललेली असते अथवा अस्तीत्वात नसते म्हणून आपण वेबसाईट पाहण्याची वेळ आणि तारीख संदर्भात नमुदकरणे श्रेयस्कर असते.
विकिपीडियावर डाव्या मेन्यूपट्टीत यासाठी 'Cite This Page / लेखाचा संदर्भ द्या' अशा शीर्षकाची विशेष सुलभ सुविधा असते. तेथून संदर्भ द्यावयाचा तारीख वेळ आणि लेख दुवा कॉपीपेस्ट करणे सोपे पडते. त्यात आपल्याला आवडलेली सायटेशन स्टाईल आपण निवडू शकता. आपण या आधी दिलेला प्रत्येक संदर्भाची लगेच तारीख वेळ दिली पाहिजे असे नाही. पण पुढील लेखन करताना आपल्याला हे लक्षात घेता येईल असे वाटते.
आपल्या ज्ञानकोशीय वाचन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०२, ९ जून २०१७ (IST)

@Mahitgar:

आपल्या अभिप्रायाबद्दाल, सूचनेबद्दल व सूचनेला अनुसरून दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. पुढील लेखन करताना मी या सूचना नक्की लक्षात ठेवीन.

Rajendra prabhune ०८:०३, १० जून २०१७ (IST)

2409:4042:708:fcca::1fa8:58ad यांचा संक्रमण (संक्रमणचा - बदलचा काळ) आणि संक्रामण (संक्रमित - Transmitted रोग) यांमधे गोंधळ झाला असावा. म्हणून हा बदल उलटवत आहे.

--Rajendra prabhune (चर्चा) २२:१०, २१ जानेवारी २०२० (IST)

"पौगंडावस्था" पानाकडे परत चला.