बाह्य दुवे

संपादन

सुंदर माहिती पूर्ण लेख बनविण्याकरिता बाह्य दुवे टाळून परिपूर्ण माहिती विकिपीडिया येईल अशी अपेक्षा. सुंदर लेखातील माहिती मराठी वाचकाला किंवा माहिती जाणून घेणार्‍याला मराठी भाषेतून मिळवता येईल असे मला वाटते. इंग्लिश भाषेतून माहिती जानण्याकरिता इंग्लिश विकिपीडिया चा वापर केला गेला असता, त्यामुळे इंग्लिश भाषेतील लिंक ऐवजी मराठीत माहिती द्यावी ही माफक आशा.. मी नवीनच आहे, चूकल्यास माझे कान उपटा.

Dr.sachin23 १६:२७, २६ एप्रिल २०११ (UTC)

योग्य मुद्दा. मात्र मराठीत पुरेशी माहिती यायला अवकाश लागेल. म्हणून येथील माहितीला पूरक असे विश्वासार्ह बाह्य दुवे नोंदवले जातात. ते शक्यतो मराठीत किंवा त्या-त्या लेखविषयाच्या स्थानिक भाषेत असले, तर उत्तमच; पण काही वेळा इंग्लिश किंवा अन्य परभाषी संकेतस्थळांवरचे दुवे केशीगणिक नोंदवायला सध्या विशेष हरकत नसावी.

अर्थात आगामी काळात जसजशी मराठी विकिपीडियावर किंवा अन्य मराठी संकेतस्थळांवर संदर्भस्रोत म्हणून वापरण्याजोगी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होत जाईल, तसतसे हे अवलंबित्व कमी होत जाईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३७, २६ एप्रिल २०११ (UTC)

"नासा" पानाकडे परत चला.