नामदेवा परत ये

नामदेवा परत ये तुझी मुंबई तुझी वाट पाहत आहे पतिव्रता होण्यासाठी ..................... नामदेवा परत ये एका गोलपिठ्याने कदाचित आमची संस्कृती बदलणार नाही ................ नामदेवा परत ये कदाचित उद्याचा सुर्य राखला असेल तुझ्याचसाठी ............ नामदेवा परत ये कदाचित पुढच्या संमेलनाचे व्यासपीठ पेलू शकेल तुझे वजन .................... नामदेवा परत ये ह्यावेळी म्हातारा मूर्ख नसेल पूर्वी इतका नामदेवा परत ये आकाशाची एक खिडकी सताड चालू असेल तुझ्यासाठी .................................. नामदेवा परत ये तुझ्या खोपटातील काळोख दिसेल सर्व जगाला ................................. नामदेवा परत ये आपली आय बहिण कधीच विटाळली जाणार नाही ............................... नामदेवा परत ये तुझ्या पापाचे आर्ष काव्य राहिले आहे लिहायचे ............................ नामदेवा परत ये तुझ्यातील बैलाचे बळ कस्टडी तोडतय आज ........................... नामदेवा परत ये तुझ्या धारदार तारुण्याला म्यान करता येईल आता ..................... नामदेवा परत ये आई मेल्याचे दुख तू सहज पचावशील रे आम्ही नाही रे .............................म्हणुन तू परत ये आमच्या आईचे रूप घेऊन आलेल्या पुरुषा तू परत ये नामदेवा परत ये.......................


प्रितम ओव्हाळ.

"नामदेव ढसाळ" पानाकडे परत चला.